एक्स्प्लोर
धारावीच्या प्रलंबित पुनर्विकासाला 'विशेष प्रकल्प दर्जा'
धारावीच्या पुनर्विकासाला जागतिक निविदा प्रक्रियेद्वारे अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला 'विशेष प्रकल्प दर्जा' ची (Special Purpose Vehicle - SPV) मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यासंबंधी निर्णय घेण्यात आला.
धारावीच्या पुनर्विकासाला जागतिक निविदा प्रक्रियेद्वारे अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे धारावीचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येणार असून त्यासाठी जागतिक पातळीवर टेंडर मागवण्यात येईल.
पुढील सात वर्षांत पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठी 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी रेल्वेकडून 90 एकर जमीन घेण्याचा प्रस्ताव आहे. निविदा प्राप्त करणारे खाजगी ठेकेदार आणि शासन यांच्यात 80-20 टक्के तत्वावर गुंतवणूक करण्यात येणार आहे.
धारावीत 104 हेक्टर भूखंडावर सुमारे 59 हजार 160 तळमजली सरंचना आहेत. तसंच या रचनांवर दोन किंवा तीन मजल्यांची बांधकामे आहेत. धारावीत एकूण 12 हजार 976 औद्योगिक आणि व्यावसायिक गाळे आहेत. या सर्व गाळेधारकांचा पुनर्विकासात सहभाग असेल
पुनर्विकास प्रकल्पात कमीत कमी 350 स्क्वेअर फुटाचे घर मिळणार आहे. 405 स्क्वेअर फूट आणि 500 स्क्वेअर फुटापेक्षा मोठे गाळे असणाऱ्यांना आहेत तेवढे 500 स्क्वेअर फूट अधिक 35 टक्के फंजीबल देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement