एक्स्प्लोर

Mumbai Corona Guidelines: कोविड बाधितांच्या गृह विलगीकरण संदर्भात सुधारीत सविस्तर सूचना निर्गमित

रुग्ण, नातेवाईक यांच्यासह वैद्यकीय मंडळी व वॉर्ड वॉर रुम यांना विविध निर्देश.गृहविलगीकरणातील एकूण रुग्णांपैकी किमान 10 टक्के रुग्णांच्या घरी समर्पित वैद्यकीय पथक दररोज आळीपाळीने देणार भेटी.

मुंबई : कोविड बाधितांच्या गृह विलगीकरण संदर्भात सुधारीत सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. गृह विलगीकरणातील एकूण रुग्णांपैकी किमान 10 टक्के रुग्णांच्या घरी समर्पित वैद्यकीय पथकाने दररोज आळीपाळीने भेटी देवून सर्व बाबींची पडताळणी करावी. रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. रुग्णास कोरोना काळजी केंद्र (सीसीसी 2) मध्ये स्थलांतरित करावे. कार्यवाहीला सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी.
  
गृह विलगीकरणासाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जे रुग्ण कोविड चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांना घरी विलगीकरण करता येवू शकते. त्यासाठी (1) लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक), (2) सौम्य लक्षणं असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप 100 फॅरनहाईटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा अधिक आहे व इतर सामान्य निकष), (3) प्रौढ व सहव्याधी असलेले असे रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत, त्यांची केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या एकत्रित सल्ल्याने विलगीकरण करता येवू शकेल.

अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक) किंवा सौम्य लक्षणं असलेले बाधित म्हणून निर्देशित केलेले असणे आवश्यक असेल. अशा रुग्णांच्या घरी स्वतःला विलग करुन घेण्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही विलगीकरणाच्या पुरेशा सुविधा असणे आवश्यक असेल. विशेषतः रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह गरजेचे आहे. घरी विलगीकरणात असलेल्या अशा रुग्णाने कुटुंबातील इतर सदस्यांपासून विशेषतः सहव्याधी असलेली ज्येष्ठ मंडळी यांच्यापासून स्वतःला दूर राखणे व स्वतंत्र खोलीत राहणे सर्वांच्या हिताचे आहे. तसेच घरी विलगीकरणात असा रुग्ण राहत असल्याबाबत नातेवाईक, शेजारी/गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकारी व रहिवाशी, नियमित कौटुंबिक चिकित्सक आणि नजीकची हेल्थ पोस्ट यांना माहिती असणे आवश्यक असेल.

संबंधित रुग्णाने पल्स ऑक्सिमीटर, डिजीटल थर्मोमीटर, फेस मास्क, हातमोजे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) इत्यादी साधने बाळगून त्यांचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. तसेच घरी विलगीकरणात असताना वॉर्ड वॉर रुम/ वैद्यकीय मंडळी/आरोग्य कर्मचाऱ्यांकडून येणारे प्रकृतीबाबत विचारणा करणारे दूरध्वनी स्वीकारुन अद्ययावत माहिती त्यांना कळवावी. महत्त्वाच्या आरोग्य निकषांच्या नोंदी ठेवाव्यात, ज्या वैद्यकीय उपचारांसाठी मदतकारक ठरतात. संपूर्ण उपचारअंती रुग्ण बरे झाल्यास त्यांचे विलगीकरण पूर्ण झाल्याबाबत प्रचलित वैद्यकीय उपचार पद्धतीनुसार वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक संमतीने निर्णय घेतील. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभाग कार्यालयांमध्ये वॉर्ड वॉर रुम स्थापित करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विभागाच्या हद्दीतील कोविड बाधित रुग्णांचे व्यवस्थापन करण्यात येते. अशा वॉर्ड वॉर रुम्ससाठीदेखील या परिपत्रकामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत. विभागाचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांनी वॉर्ड वॉर रुममध्ये पुरेसे मनुष्यबळ व त्यांचे प्रमुख नेमावेत. जेणेकरुन घरी विलगीकरणातील सर्व रुग्णांशी नियमित दूरध्वनी संपर्कासाठी व्यवस्था होईल. 

दररोज कोविड बाधितांची यादी प्राप्त झाल्यानंतर वॉर्ड वॉर रुमने गरजू रुग्णांना रुग्णवाहिकांच्या सहाय्याने रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची व्यवस्था प्राधान्याने करावी व निर्धारित निकषांनुसार पात्र रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवावे. ही कार्यवाही त्याच दिवशी पूर्ण करावी. रुग्णाला घरी विलगीकरण करण्याची सूचना दिल्यानंतर वैद्यकीय पथकाच्या मदतीने अशा रुग्णाचे घर विलगीकरणासाठी योग्य असल्याची खात्री करावी व योग्य तो निर्णय घ्यावा. गृह विलगीकरणातील रुग्णांची यादी हेल्थ पोस्टला पाठवून त्याची पडताळणी करावी. रुग्णांना वॉर्ड वॉर रुमचे संपर्क उपलब्ध करुन द्यावेत. वॉर रुमच्या वैद्यकीय पथकाने अशा रुग्णांमध्ये असलेल्या लक्षणांविषयी तसेच सहव्याधी असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती घ्यावी. प्रसुतिकाळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना घरी विलगीकरण लागू नसेल. तर स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या एकत्रित विचारविनिमयानुसार योग्य निर्णय घ्यावा. रुग्णांबाबतच्या दैनंदिन नोंदी वॉर्ड वॉर रुमने नोंदवाव्यात. तसेच संपर्क होत नसलेल्या रुग्णांची माहिती वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) किंवा हेल्थ पोस्ट यांना कळवावी.

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे वाढीस लागली तर त्यांना त्वरेने रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी उपचार करत असलेले वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ यांनी निर्णय घ्यावा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget