एक्स्प्लोर

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी यंदाची दिवाळी काळी ठरणार?

एकीकडे भूमिपूत्र असलेला डबेवाला आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे बहुतांश परप्रांतीय असलेल्या असंघटित कामगारांना पाच हजारांची आर्थिक मदत राज्य सरकारने केली.

मुंबई : दिवाळी अवघ्या 10 दिवसांवर आलेली असताना सर्वसामान्यांसाठी लोकलफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. याचे गंभीर परिणाम मुंबईतील डब्बेवाल्यांच्या व्यवसायावर झालेला आहे. कारण कर्मचारीच नसल्याने डबे पोहचवणार कोणाला असा प्रश्न आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास आर्थिक कोंडीमुळे यंदाची दिवाळी मुंबईतील डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरणार आहे.

मुंबईतील डबेवाल्यांच संपूर्ण जगभर नाव आहे. मात्र हेच डबेवाले सध्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून घरीच बसून असलेल्या डबेवाल्यांना काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी आपल्या घरात कशी साजरी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. डबेवाल्यांचा व्यवसाय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. ग्राहकच घरी असल्याने लोकल असून नसल्यासारखी असल्याचे डबेवाले सांगतात. लोकलमधील गर्दी नियोजनाची बैठकच रखडल्याने सुमारे 65-70 लाख प्रवाशांचा लोकलप्रवासाला बसलेली खीळ कायम आहे. राज्य सरकारकडून बैठक आयोजित करण्यात येणार आहे. गर्दी विभागण्यासाठी कार्यालयीन वेळ बदलाबाबत सरकारकडून काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सद्यस्थितीत जवळपास 10-15 लाख अत्यावश्यक प्रवासी लोकल फेऱ्यांमधून प्रवास करत आहे. एकीकडे भूमिपूत्र असलेला डबेवाला आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे बहुतांश परप्रांतीय असलेल्या असंघटित कामगारांना पाच हजारांची आर्थिक मदत राज्य सरकारने केली. डबेवाल्यांची यात नोंद असूनही त्यांना मदत मिळाली नाही.

आधीच काम नाही. आता आर्थिक मदतीची आशा ही संपुष्टात आली आहे. या स्थितीत जेवणाची चिंता भेडसावत असताना तोंडावर आलेली दिवाळी मुंबईतील डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरणार आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून असंघटित कामगारांना ज्या पद्धतीने 5 हजार रुपये अनुदान जाहीर केला ते अनुदान त्वरित डबेवाल्यांना द्यावं आणि त्यांचा हा दिवाळी सण गोड करावा अशी मागणी डबेवाल्यांकडून होताना दिसत आहे.

Mumbai Dabewale reaction | लोकलने प्रवासाची परवानगी दिल्यानंतर मुंबईचे डबेवाले म्हणतात..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News: मोठी बातमी: उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूर, मंगळवेढा अन् सांगोल्यासाठी खुशखबर
मोठी बातमी: उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूर, मंगळवेढा अन् सांगोल्यासाठी खुशखबर
Pune Cylinder Blast: पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO
पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO
हार्ट फेल होण्यापूर्वी दिसतात ही तीन लक्षणं
हार्ट फेल होण्यापूर्वी दिसतात ही तीन लक्षणं
Donate Sperm: बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात केलंय स्पर्म डोनेट, या दिग्दर्शकाने तर पैसेही कमावलेत
बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात केलंय स्पर्म डोनेट, या दिग्दर्शकाने तर पैसेही कमावलेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhirendra Shastri Cricket : मुंबई पोलिसांसह खास क्रिकेट मॅच, धीरेंद्र शास्त्रींचा रन आऊट पाहाच!Sanjay Raut Mumbai : विष्णूचे अवतार गप्प, जग ट्रम्प विरोधात, देवाने सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे- राऊतABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 09 April 2025Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha |10 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News: मोठी बातमी: उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूर, मंगळवेढा अन् सांगोल्यासाठी खुशखबर
मोठी बातमी: उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूर, मंगळवेढा अन् सांगोल्यासाठी खुशखबर
Pune Cylinder Blast: पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO
पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO
हार्ट फेल होण्यापूर्वी दिसतात ही तीन लक्षणं
हार्ट फेल होण्यापूर्वी दिसतात ही तीन लक्षणं
Donate Sperm: बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात केलंय स्पर्म डोनेट, या दिग्दर्शकाने तर पैसेही कमावलेत
बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात केलंय स्पर्म डोनेट, या दिग्दर्शकाने तर पैसेही कमावलेत
Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग; 13 पुजाऱ्यांची नावे आली समोर
खळबळजनक! तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग; 13 पुजाऱ्यांची नावे आली समोर
Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत उच्चस्तरीय समितीच्या अहवालात नेमकं काय? 'त्या' नियमाचा भंग झाल्याचे उघड, पण...
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत उच्चस्तरीय समितीच्या अहवालात नेमकं काय? 'त्या' नियमाचा भंग झाल्याचे उघड, पण...
USA Tariffs On China: ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांनी तो निर्णय घेतलाच, चीनवर 104 टक्के आयातशुल्क
ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांनी तो निर्णय घेतलाच, चीनवर 104 टक्के आयातशुल्क
मुंबईकरांना सलग तिसरा धक्का, सीएनजी-पीएनजीचे दर वाढले, पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर काय घडलं?
मुंबईकरांना सलग तिसरा धक्का, सीएनजी-पीएनजीचे दर वाढले, पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर काय घडलं?
Embed widget