एक्स्प्लोर

कॉन्फिडन्स तर बघा! दोन महिन्याआधी नोकरीला लागला अन् पावणे दोन कोटींच्या रकमेसह कॅश व्हॅन घेऊन पळाला

एटीएम मशीनमध्ये (ATM Machine) भरण्यासाठी आणलेले पैसे घेऊन कॅश व्हॅनचा (Cash Van) चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना गोरेगावमध्ये घडली होती.

Mumbai Goregaon Crime: एटीएम मशीनमध्ये (ATM Machine) भरण्यासाठी आणलेले पैसे घेऊन कॅश व्हॅनचा (Cash Van) चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना गोरेगावमध्ये घडली होती. या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. एटीएम मशिनमध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या या कॅश व्हॅनमध्ये 2 कोटी 80 लाख रूपये होते. चालक व्हॅनसह हे पैसे घेऊन फरार झाला होता. वेगवेगळ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन निघाली होती. संधी मिळताच चालक ही व्हॅन घेऊन फरार झाला होता.

ज्यावेळी चालक त्या व्हॅनसह पळून गेला त्यावेळी त्या व्हॅनमध्ये एकूण 2 कोटी 80 लाख रुपये होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर गोरेगाव पोलिस स्टेशनला (Goregaon Police News) माहिती देण्यात आली. कॅश व्हॅन वेगवेगळ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅश घेऊन आली होती. 

सोमवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान तो कंपनीतील त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन निघाला. गोरेगाव पश्चिमेकडे असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. कॅश व्हॅन बँकेजवळ थांबल्यावर उदयभानचे सहकारी रोकड भरण्यासाठी खाली उतरले. ते काम आटपून परतले, तेव्हा उदयभान तिथे नव्हता. उदयभान व्हॅन घेऊन तिथून गेला होता. त्यांनी उदयभानला वारंवार फोन केले. मात्र त्यानं प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्यांनी जीपीएसच्या माध्यमातून उदयभानचं लोकेशन शोधलं.  

पोलिसांनी कॅश व्हॅनमध्ये बसवलेल्या जीपीएसच्या मदतीने वाहनाचे लोकेशन ट्रेस केले असता कॅश व्हॅन गोरेगावच्या पिरामल नगरमध्ये उभी असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तिथे पोहोचले. त्यावेळी तिथं वाहन मिळून आलं मात्र चालक तिथं नव्हता, तसेच पैसे देखील गायब होते. यानंतर पोलिसांनी व्हॅन ताब्यात घेऊन चालकाचा शोध सुरू केला.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी चालक उदयभान सिंह (वय 34) याला पालघर येथून अटक केली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून कॅश मॅनेजमेंट एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget