एक्स्प्लोर

Mumbai Crime : दाम्पत्याने दोन दिवसांच्या नवजात बालकाला रिक्षात सोडून अपहरणाचा बनाव रचला, पोलिसी खाक्या दाखवताच सत्य सांगितलं

Mumbai Crime : मुंबईतील दाम्पत्याने अवघ्या दोन दिवसांच्या नवजात बाळाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपास करुन जे सत्य समोर आणले आहे ते ऐकूनच पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही.

Mumbai Crime : मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने (Couple)आपल्या अवघ्या दोन दिवसांच्या नवजात बाळाचे (New Born Baby) रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. मात्र जुहू पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपास करुन जे सत्य समोर आणले आहे ते ऐकूनच पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. शिवाय या निर्दयी पालकांविषयी संतापाची लाट नक्कीच उसळेल. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

बाळाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास जुह गल्ली परिसरात राहणाऱ्या इमरान सैनूर खान (वय 28 वर्षे ) त्याची पत्नी रहनुमा इमरान खान (वय 25 वर्षे) या दाम्पत्याने आपल्या दोन दिवसांच्या बालकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. आपल्या तक्रारीत त्याने म्हटलं की,  वॉशरुमला जाण्याच्या कारणाने मी रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितलं. परत येईपर्यंत बाळाकडे लक्ष दे असं सांगून मी उतरलो. परंतु परत आल्यानंतर पाहिलं असता, रिक्षात बाळ नसल्याचं दिसलं.

Mumbai Crime : दाम्पत्याने दोन दिवसांच्या नवजात बालकाला रिक्षात सोडून अपहरणाचा बनाव रचला, पोलिसी खाक्या दाखवताच सत्य सांगितलं

जुहू पोलिसांनी तपासास सुरुवात करुन त्यांच्या  शेजाऱ्यांकडे देखील चौकशी केली. यात शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रहनुमा खान हिची 29  जुलै रोजी राहत्या घरी प्रसुती झाली. तिने मुलाला जन्म दिला. परंतु दोन दिवसानंतर नवजात बालक दिसून आले नाही म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी देखील केली.

पोलिसी खाक्या दाखवताच दाम्पत्याने सत्य सांगितलं

बालकाचं अपहरण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि गणेश जैन, पो.उ. नि.सीमा फरांदे, पो. ह.पाटील, पो. ह. खोमणे, पो. शि. कणमुसे, पो.शी.पन्हाळे या तपास पथकाने संबंधित दाम्पत्याची कसून चौकशी केली. चौकशीतून जे सत्य समोर आलं ते मात्र भयानक होतं. तपास पथकाने पोलिसी खात्यात दाखवताच दाम्पत्याने खरं काय घडलं ते सांगितलं.  जन्मदात्यांनीच आपल्या नवजात बालकाला सांताक्रूज पश्चिम इथल्या खिरा नगर इथे पार्क केलेल्या रिक्षामध्ये सोडून दिल्याचं कबूल केलं. 

यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांताक्रूज पोलिसांना संपर्क साधला असता 30 जुलै रोजी ऑटोरिक्षामध्ये नवजात बालक सापडलं असल्याचं समजलं. यासंदर्भात सांताक्रूज पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात कलम 317 भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यानंतर जुहू पोलिसांनी इमरान खान आणि रहनुमा खान यांना सांताक्रूज पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तर बाळाची प्रकृती व्यवस्थित असून त्याला देखरेखीसाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा

Mumbai News: कचराकुंडीत आढळलेल्या अर्भकाला राजावाडी रुग्णालयाने दिले जीवदान; वेळीच उपचार मिळाल्याने वाचले बाळाचे प्राण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget