(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Cases : मुंबईत अडीच महिन्यांनंतर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार पेक्षा कमी, आज 953 रुग्णांची नोंद
मुंबईत आज 953 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2258 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी आज दिलासादायक बातमी आहे. जवळपास अडीच महिन्यांनंतर मुंबई कोरोना बाधितांची रुग्णसंख्या 1 हजार पेक्षा कमी आढळली आहे. मुंबईतर आज 953 कोरोना बाधिती रुग्णांची नोंद झाली आहे, तर 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी 2 मार्च रोजी मुंबई 1 हजारहून कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 2 मार्चला मुंबईत 849 रुग्णांची नोंद झाली होती, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मुंबईत आज 953 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2258 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 32 हजार 925 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 1657 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2572 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला . मुंबईचा डबलिंग रेट हा आता 255 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर गेले आहे.
राज्यात आज 28 हजार 438 कोरोनाबाधित रुग्णांचा नोंद
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. राज्यात आज 52 हजार 898 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 28 हजार 438 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 49, 27, 480 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.69% एवढे झाले आहे. राज्यात आज 679 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. राज्यात आज एकूण 4,19,727 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात देशात 2,63,533 रुग्णांची नोंद
देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, काल देशात 4329 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. तर चार लाख 22 हजार 436 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देशात 19 एप्रिल 2021 नंतर पहिल्यांदाच एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 19 एप्रिल 2021 रोजी देशात दोन लाख 59 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
- Maharashtra Corona Update : दिलासा...! राज्यात आज 52,898 रुग्ण बरे होऊन घरी तर 28, 439 नवीन रुग्णांचे निदान
- भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत, सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
- सिंगापूरमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे तिसरी लाट येऊ शकते, सिंगापूरला जाणारी हवाई सेवा थांबवावी : अरविंद केजरीवाल
- Covaxin Clinical Trail : 'कोवॅक्सिन'च्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला 10 -12 दिवसात सुरुवात