Mumbai Corona Update : मुंबईत 56 नवे कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णांची संख्या 346
Mumbai Corona Update : मुंबईत आज 56 नवे कोरोनाबाधित आढळले असून एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत आज नव्याने 56 कोरोनारुग्ण( Mumbai Corona Update) आढळले आहेत. कोरोनारुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 50 च्या जवळपास आढळत आहे. आज नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 346 इतकी झाली आहे. याशिवाय मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई पालिका क्षेत्रात 56 कोरोनाबाधित आढळले असून आसपासच्या क्षेत्राचा विचार करता, ठाण्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढलेला नाही. ठाणे पालिका क्षेत्रात दोन, नवी मुंबईत सहा, रायगडमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, पालघरमध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 14, 2022
14th April, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 56
Discharged Pts. (24 hrs) - 40
Total Recovered Pts. - 10,38,716
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 346
Doubling Rate -15325 Days
Growth Rate (7th April- 13th April)- 0.004%#NaToCorona
राज्यात 103 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 103 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 745 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 77 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 103 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात सध्या 745 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 745 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 346 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 50 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
संबंधित बातम्या