Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या 24 तासात 405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर 495 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4713 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1169 दिवसांवर गेला आहे.
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 495 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,20,487 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 16 हजार 122 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.
मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4713 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1169 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 44 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 2, 2021
2nd October, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 405
Discharged Pts. (24 hrs) - 495
Total Recovered Pts. - 7,20,487
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 4713
Doubling Rate - 1169 Days
Growth Rate (25 September - 1 October)- 0.06%#NaToCorona
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 062 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 77 हजार 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे. राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 096 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (11), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (36), परभणी (61), हिंगोली (15), नांदेड (11), अकोला (24), वाशिम (08), बुलढाणा (09), यवतमाळ (09), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.