Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या 24 तासात 394 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर 477 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4611 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 394 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 28 हजार 838 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.
मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4611 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1200 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 52 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 28, 2021
28th September, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 394
Discharged Pts. (24 hrs) - 477
Total Recovered Pts. - 7,18,813
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 4611
Doubling Rate - 1200 Days
Growth Rate (21 September - 27 September)- 0.06%#NaToCorona
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.
राज्यात सध्या 37 हजार 794 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,54,985 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 84, 29, 804 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,44, 606 (11.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.























