Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी 1803 रुग्णांची वाढ, 959 रुग्ण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 1702 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढली असून कोरोना रुग्णांचा स्फोटच मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1803 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 959 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 50 हजार 285 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 573 झाली आहे. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1803 रुग्णांमध्ये 1692 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 513 झाला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 12, 2022
12th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1803
Discharged Pts. (24 hrs) - 959
Total Recovered Pts. - 10,50,285
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 10889
Doubling Rate - 513 Days
Growth Rate (5th June- 11th June)- 0.133%#NaToCorona
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 10889 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 2805 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 1128 सक्रीय रुग्ण आहेत. पालघर 446, रायगड 530, रत्नागिरी 21, सिंधुदुर्ग 25, सोलापूर 14, नाशिक 82, अहमदनगर 37, जळगाव 12, औरंगाबाद 18, लातूर 28, नांदेड 11, अकोला 17, वाशिम 15, बुलढाणा 11, नागपूर 179 आणि चंद्रपूरमध्ये 17 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 16370 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल 2946 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1803 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
संबंधित बातम्या