Mumbai Corona Update : मुंबईत गुरूवारी 1702 रुग्णांची वाढ, 703 रुग्ण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1702 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढली असून कोरोना रुग्णांचा स्फोटच मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 703 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 47 हजार 675 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 570 झाली आहे. सध्या मुंबईत 7998 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1702 रुग्णांमध्ये 1624 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दरही एका दिवसात हजारच्या खाली गेला असून 733 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 9, 2022
9th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1702
Discharged Pts. (24 hrs) - 703
Total Recovered Pts. - 10,47,675
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 7998
Doubling Rate - 733 Days
Growth Rate (2nd June- 8th June)- 0.093%#NaToCorona
राज्यात गुरूवारी 2813 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,42, 190 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.98 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एका कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे.