Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी 1310 रुग्णांची नोंद, 1116 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 1310 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1310 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 1116 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 62 हजार 280 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 585 झाली आहे. सध्या मुंबईत 14 हजार 089 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1310 रुग्णांमध्ये 1213 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 374 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 20, 2022
20th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1310
Discharged Pts. (24 hrs) - 1116
Total Recovered Pts. - 10,62,280
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 14089
Doubling Rate - 374 Days
Growth Rate (13th June- 19th June)- 0.181%#NaToCorona
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 14089 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5522 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 2007 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 783, रायगड 1052, रत्नागिरी 57, सिंधुदुर्ग 56, सातारा 32, सांगली 10, कोल्हापूर 27, सोलापूर 31, नाशिक 158, अहमदनगर 69, जळगाव 16, औरंगाबाद 50, लातूर 44, परभणी 10, उस्मानाबाद 13, अमरावती 21, अकोला 18, वाशिम 37, बुलढाणा 20, नागपूर 309, वर्धा 24, भंडारा 35, गोंदिया 15, गडचिरोली 29 आणि चंद्रपूरमध्ये 43 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 23746 सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत आज काहीशी घट झाल्याचं दिसून आलं. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली असून आज 2354 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1485 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1310 रुग्णांची भर पडली आहे.
संबंधित बातम्या