(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवीन वर्षात मुंबईकरांना गुड न्यूज, कोंडी सुटणार, मार्ग निघणार, कोस्टल रोडचं काम पूर्ण?
नवीन वर्षात मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या कटकटीवर उतारा मिळणार आहे. नव्या वर्षात जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांकरता कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होत आहे.
मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या कटकटीवर उतारा मिळणार आहे. नव्या वर्षात जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांकरता कोस्टल रोडचा (Coastal Road) पहिला टप्पा सुरु होत आहे. मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं 85% काम पूर्ण झाले आहे. सर्वात मोठ्या रुंदीचे जुळे बोगदे , आंतरराष्ट्रीय दर्जाचे अष्टभुजा पुल , मुंबईला मिळणारा मरिन ड्राईव्ह सारखा नवा मानवनिर्मीत सागरी किनारा ही कोस्टल रोडची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.
कसा आहे कोस्टल रोड आणि मुंबईला या कोस्टलरोडकडून काय मिळणार?
- प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंतचा 10.58 किमीचा कोस्टल रोड तीन पॅकेजमध्ये विभागला आहे.
- प्रिन्सेस स्ट्रीट पूल - प्रियदर्शनी पार्क = 4.05 किमी
- प्रियदर्रशनी पार्क ते बडोदा पॅलेस = 3.82 किमी
- बडोदा पॅलेस ते बांद्रा वरळी सिलींक = 2.71 किमी
कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रात भराव टाकण्यात आले आहेत.समुद्राच्या लाटांचा प्रभाव रोखण्याकरता नैसर्गिक बेसॉल्ट खडकांची समुद्र भिंत तयार करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्हवर आहेत तसे कॉक्रिंटचे टेट्रापॉड वापरणे टाळले आहे. तसेच, मरिन ड्राईव्हसारखाच प्रियदर्शीनी पार्क ते वरळीपर्यंतचा भलामोठा नवा मानवनिर्मीत सागरी किनारा मुंबईकरांना मिळेल. तिथे मरिनड्राईव्ह सारखीच बसण्याची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत
खवळलेल्या समुद्री लाटांपासून कोस्टल रोड आणि मुंबईला वाचवता येईल?
कोस्टल रोड आणि पर्यायानं मुंबईचं संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशांतील कामांचा अभ्यास करुन बनवली गेली आहे. समुद्र भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडले गेले आहेत. समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र समुद्र भिंत बांधतांना वापरले गेले. राष्ट्रीय समुद्र विद्यान संस्था या समुद्राचा अभ्यास करणारी यंत्रणेकडून कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढुळपणा यांचा अभ्यास करणारी यंत्रणा मुंबईच्या समुद्रात कार्यरत केली गेली. दर सहा महिन्यांनी सरकारकडे या यंत्रणेकडून अहवाल दिला जातोय. त्यामुळे समुद्रातील आगामी धोक्यांची सूचना यंत्रणेला मिळू शकते .
कोस्टल रोडमुळे मुंबईला काय मिळणार?
- 70 टक्के प्रवासाचा वेळ वाचेल
- प्रिन्सेस स्ट्रीट पासून वांद्रे वरळी सिलींकपर्यंतय एक तास लागतो त्याऐवजी 10 मिनीटात पोहोचता येणार
- 30 टक्के टक्के इंधनाची बचत होईल
- वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल
- मुंबईत चार ठिकाणी नव्यानं 1800 चारचाकी वाहनांना भुमीगत पार्किंगची सोय निर्माण होईल
- प्रियदर्शीनी पार्क ते वरळीपर्यंतचा 7.30 किमीचा 70 हेक्टरवर पसरलेला नवा हिरवा पट्टा मुंबईकरांना मिळेल.
- मरिन ड्राईव्हसारखा नवा ऐसपैस मानवनिर्मीत सागरी किनारा मुंबईकरांना मिळेल
हे ही वाचा :
Maharashtra News: मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा