एक्स्प्लोर

मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक!

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर रविवारी सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत ब्लॉक आहे. तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे डाऊन मार्गावर 11.40 ते दुपारी 4.40 आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक आहे.

मुंबई : लोकल सेवेच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज (रविवार) सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, सोमवार 12 मार्चच्या मध्यरात्री घाटकोपर इथेही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत ब्लॉक आहे. - त्यात, कल्याणहून सुटणाऱ्या सर्व फास्ट लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 3.56 मध्ये दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान स्लो मार्गावर चालवल्या जातील. परळनंतर त्या पुन्हा फास्ट मार्गावर चालवल्या जातील. - सीएसएमटीहून सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 पर्यंत सुटणाऱ्या फास्ट-सेमी फास्ट लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांत थांबतील. - ब्लॉक कालावधीत दादर आणि सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांत स्लो मार्गावर चालवल्या जाणार आहेत. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकात थांबणार रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजरला दादरऐवजी दिवा स्थानकात अंतिम थांबा राहील. परतीच्या मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातूनच सुटेल. दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांच्या सुविधेसाठी दादरहून दु. 3.40 वाजता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील ह्या सेवा बंद - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक आहे. - सीएसएमटी/वडाळ्याहून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद राहणार आहे. - अप हार्बर मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी सेवा सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 आणि वांद्रे/अंधेरी लोकल सेवा सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.09 पर्यंत बंद राहील. या कालावधीत पनवेल आणि कुर्लाहून विशेष फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. घाटकोपर स्थानकात विशेष ब्लॉक सोमवार, 12 मार्च रोजी मध्यरात्री 12.45 ते पहाटे 5.55 पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. - या ब्लॉकमुळे एलटीटी-अलाहाबाद एक्स्प्रेस पहाटे 5.23 ऐवजी सकाळी 6 वाजता सुटेल. - एलटीटी-मुझफ्फराबाद एक्स्प्रेस दुपारी 12.15 ऐवजी दुपारी 2.20 वाजता सुटेल. - शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस पहाटे 4.50 ऐवजी सकाळी 7 वाजता येईल. - शालिमार-एलटीटी पहाटे 5.50 ऐवजी सकाळी 7.30 वाजता येईल. जिते, आपटा स्थानकांमध्येही ब्लॉक कोकण रेल्वे मार्गावरील आपटा आणि जिते स्थानकांदरम्यान मंगळवार, 13 ते 18 मार्चदरम्यान आणि 22 मार्च आणि 5 एप्रिल या दोन दिवशीही ब्लॉक घेतला जाणार आहे. खारपाडा इथे पूल बांधला जाणार असून, त्यासाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. या ब्लॉकच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget