एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलचे चाक रुळावरुन घसरले
विद्याविहार स्थानकाजवळ लोकलचा डब्बा घसरला, कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प, दादरसह कुर्ला, घाटकोपर स्थानकात प्रचंड गर्दी
मुंबई : ऐन रविवारी मध्य रेल्वेवर लोकल मध्ये बिघाड वाहतूक विस्कळीत झाली आहे. विद्याविहार ते कुर्ला स्थानकादरम्यान रात्री 9 वाजेच्या सुमारास धीम्या मार्गावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका लोकलच्या डब्याचे चाक रुळावरुन घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
डब्याचे चाक रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे याच लोकलच्या आणखी डब्यात शॉर्ट सर्किट होऊन धूर निघाला आहे. या दोन्ही घटनांमुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झालीय.
Mumbai Local | दोन तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलचे चाक रुळावरुन घसरले | ABP Majha
या घटनांमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. परिणामी जलद मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दादर कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळलीय.
रेल्वे रुळांना तडे, ओव्हरहेड वायर तुटणे, इतर तांत्रिक बिघाड आदी कारणांमुळं मध्य रेल्वेची वाहतूक कायमच विस्कळीत होते. त्यामुळे मेगाब्लॉक दरम्यान नेमके काय काम केले जाते यावर प्रश्नचिन्ह होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement