Mumbai : मुंबईकरांना मिळणार दर्जेदार रस्ते; 400 किमीच्या सिमेंट क्रॉंक्रिट रस्त्यासाठी नव्यानं निविदा; कामासाठी ही नवी अट
मुंबईतील सिमेंट कॉंक्रिट रोडच्या कामाचा खर्च जवळपास 200 कोटींनी वाढला आहे. ऑगस्टमध्ये काढलेल्या निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला.
Mumbai Road News Update: मुंबईकरांना आता टिकाऊ आणि दर्जेदार रस्ते मिळणार आहेत. हे रस्ते कधी मिळणार? या प्रश्नाचं उत्तर जरी आता आपल्याकडे नसलं तरी यादृष्टीनं पालिकेनं तयारी केली आहे. 400 किमीच्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. मुंबईतील सीसी रोडच्या कामाचा खर्च जवळपास 200 कोटींनी वाढला आहे. ऑगस्टमध्ये काढलेल्या निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाचा जोर आहे. शहर आणि दोन्ही उपनगरातील 400 किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्यासाठी तब्बल 6 हजार 79 कोटी 51 लाख 74 हजार 502 रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.या निविदेत परदेशात वापरणारे पोरस सिमेंट वापराची अट घालण्यात आली आहे.
सिमेंट क्रॉंकिटच्या रस्त्यांसाठी होणारा खर्च
शहर विभाग - 1233 कोटी 11 लाख 19 हजार 021
पूर्व उपनगर - 846 कोटी 17 लाख 61 हजार 299
पश्चिम उपनगर
- झोन : 3 - 1223 कोटी 84 लाख 83 हजार 230
- झोन : 4 - 1631 कोटी 19 लाख १८ हजार 564
- झोन : 7 - 1145 कोटी 18 लाख 92 हजार 388
एवढ्या किलोमीटर रस्त्यांची होणार कामे
पश्चिम उपनगर - 253.65 किमी
पूर्व उपनगर - 70 किमी
शहर विभाग - 72 किमी
मुंबईतील 400 किमी रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदेसाठीही अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
परंतु नव्या दरामुळे या निविदा प्रक्रियेत रस्त्याच्या खर्चामध्ये १७ टक्क्यांची वाढ होईल असे अपेक्षित केले जात आहे. त्यामुळे संपूर्ण कामाचा खर्च हा 200 कोटींनी वाढण्याची शक्यता आहे.
याआधीच्या ऑगस्टमध्ये काढलेल्या निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला.
पालिकेकडून अतिशय कडक अटी व शर्तींमुळे याआधीच्या निविदा प्रक्रियेत अवघ्या सात कंपन्यांनी सहभाग घेतला होता. परंतु अत्यल्प प्रतिसादामुळेच पालिकेने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ही बातमी देखील वाचा