एक्स्प्लोर
Advertisement
पाणी उकळून प्या, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेचे 30 हजार कर्मचारी कार्यरत होते, अशी माहिती बीएमसी आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली.
मुंबई : मुंबईत मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने बुधवार सकाळपासून उघडीप घेतली आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचाही आता निचरा होत आहे. मुंबईतील पावसाबद्दल बीएमसी आयुक्त अजॉय मेहता यांनी माहिती दिली आहे.
महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची माहिती
- 23 ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद
- मुंबईभर सरासरी 200 मिमी पाऊस
- मंगळवारी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान सर्वात जास्त पाऊस
- भांडुप, माटुंगा, वरळी, कुर्ला येथे एका तासात 100 मिमी पावसाची नोंद
- 15 ठिकाणी काल ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलं
- 313 पंप मुंबईभर लावण्यात आले, 229 पंपांद्वारे पाणी पिक अवरमध्ये बाहेर काढण्यात आलं
- 30 हजार महापालिकेचे कर्मचारी कार्यरत होते
- पावसात फ्लोटिंग मटेरियलमुळे मोठी अडचण. प्लास्टिक, थर्माकोलमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब
- 227 झाडं पडण्याच्या तक्रारी
- सिव्हरेज लाईनचे पाणी बाहेर काढण्यासाठी जे 110 पंप महापालिकेकडे आहेत, त्या 110 पंपांचा उपयोग काल पावसाचं पाणी उपसण्यासाठी.
- 3 हजार 756 दशलक्ष लिटर पाणी काढण्यात आलं. हा महापालिकेनं केलेला पहिलाच प्रयोग
- 425 प्रवाशांना फायर ब्रिगेडने रेल्वेतून बाहेर काढलं
- 70 शाळांमध्ये पाच हजार व्यक्तींना नाईट शेल्टर उपलब्ध करुन दिलं. एनजीओ, धर्मदायी संस्था, सामान्य नागरिकांचाही सहभाग
- पाणी ओसरल्यानंतर सकाळपासून समुद्रकिनारे, रस्त्यांवरचा कचरा काढण्यासाठी 28 हजार कर्मचारी कार्यरत
- हॅम रेडिओ ऑपरेटर्सची विशेष मदत, टेलिम्युनिकेशन सेवा विस्कळीत होत होती
- आरोग्यविषयक प्रश्न उद्भवण्याची भीती. ताप, उलट्या यासारखे आजार जाणवले तर ताबडतोब नागरिकांनी तपासणी केंद्रांवर यावे, स्वत: उपचार करु नयेत. 175 डिस्पेन्सरीजची व्यवस्था
- पुढील काही दिवस पाणी उकळून प्यावं, कारण कालच्या पावसानं पाईपलाईनमध्ये लिकेज होऊन पाणी दूषित होण्याची शक्यता
- आजूबाजूला साचलेलं पाणी ताबडतोब काढून टाका, महापालिका त्यादृष्टीनं सर्व पावलं उचलत आहे
- काल बेस्टमधून 3146 बस चालवल्या. त्यापैकी 146 बस स्टेशनमार्गे चालवल्या, तसंच सीएसएमटीवरुन विशेष बसही चालवण्यात आल्या
- ईदच्या पार्श्वभूमीवर देवनारमध्ये एक लाखाहून अधिक जनावरांना जवळच्या कोरड्या जागेत स्थलांतरित करण्यात आलं
- हिंदमाताला पाणी तुंबलं, मात्र ज्या वेगानं हिंदमाताला पाण्याचा निचरा होणं आवश्यक होतं, त्या वेगाने ते उतरलं नाही
- हिंदमातावर काही ना काही चुकलंच, पंप चालू होते, तरी पाणी गेलं नाही, पाईप चोकअप होते की नेमकी काय अडचण होती, याची तपासणी होईल
संबंधित बातम्या :
LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स
मुंबईचा पाऊस : कालच्या पावसात अनेकजण बेपत्ता
मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू
26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?
मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू
मुंबईत पुन्हा पाऊस सुरु, गरज असेल तरच बाहेर पडा!
मुंबईत कुठे कुठे जेवण-खाणे आणि राहण्याची सोय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement