एक्स्प्लोर

Mumbai Best Bus Accident: गिरगावात अनर्थ टळला, मेट्रोच्या कामाजवळील रस्ता खचला अन् बस पाच फूट खड्ड्यात पडली

Mumbai Best Bus Accident: मुंबई मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून जात असलेली बेस्ट बस रस्ता खचल्याने खड्ड्यात अडकल्याची घटना घडली आहे.

Mumbai Best Bus Accident: मुंबईच्या गिरगाव (Girgaon) परिसरात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. ठाकूरद्वार सिग्नलजवळ मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळून जात असताना बेस्टची एक बस अचानक रस्ता खचल्याने पाच फूट खोल खड्ड्यात अडकली. 

गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नलजवळ मुंबई मेट्रोचे खोदकाम सुरू आहे. त्याच भागात रस्त्याच्या समांतर बाजूने बेस्टची बस प्रवाशांसह जात होती. मात्र, अचानक बसच्या मागच्या चाकाखालील रस्ता खचला आणि ती बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली. या भागात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे जमीन कमकुवत झाली होती, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये काही प्रवासी होते. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.  

दरम्यान, हा रहदारीचा रस्ता असून सकाळी चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असते. त्यामुळे बेस्ट वाहतूक देखील या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होते. त्यातच मेट्रो मुंबई मेट्रो लाईन 3 चे काम या परिसरात सुरू आहे. आणि आज बसचा या ठिकाणी अपघात झाला. वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळेच हे परिस्थिती उद्भवली आहे, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर, या रस्त्यावरून जात असताना अचानक मागचे टायर खड्ड्यामध्ये अडकले. बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असल्याची माहिती बस चालकाने दिली आहे. आता ही खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.  

मुंबईत डंपर चालकाने 3 जणांना चिरडले

दरम्यान शनिवारी मुंबईतील गोवंडी शिवाजीनगर भागात एका डंपर चालकाने 3 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात (Accident) तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंकरोडवर शिवाजीनगर भागात हा अपघात झाला. संतप्त जमावाने या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला होता. जमावाकडून डंपरच्या काचा फोडून तोडफोड देखील करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Shirdi Crime News: वाढदिवसाच्या पार्टीसाठी व्यक्तीला लुटलं अन् वार करुन संपवलं, 7 अल्पवयीन मुलांच्या कृत्याने शिर्डी हादरली

Indrayani Kundmala bridge collapse: मी डोळ्यांदेखत तिघांना मरताना पाहिलं, लोक सांगत होते घाई करु नका, पण... इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशने काय सांगितलं?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle death last rites:
आता 93 आलं, आता जायचं! चार दिवसांपूर्वी आशाताई गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण....
पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण....
Asha Bhosle Last Post: आशा भोसलेंची शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल; सांकेतिक चित्र, भग्न अवशेष... नेमकं काय म्हणाल्या होत्या?
आशा भोसलेंची शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल; सांकेतिक चित्र, भग्न अवशेष... नेमकं काय म्हणाल्या होत्या?
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
Asha Bhosle death last rites:
आता 93 आलं, आता जायचं! चार दिवसांपूर्वी आशाताई गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Embed widget