एक्स्प्लोर

BDD : बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राजीव गांधींच्या नावाने ओळखली जाणार, नामकरणाचा शासन निर्णय जारी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या नामकरणाची घोषणा केली होती. आता त्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. 

मुंबई: वरळीतील बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ ही शरद पवार नगर तर ना. म. जोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे. या संबंधितील नामकरणाचा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या नामकरणाची घोषणा केली होती.

मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती 100 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीची पुर्नविकास योजना कार्यान्वित झालेली आहे. मुंबईतील 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या गोष्टी सरकारच्या अजेंड्यावर आहेत. 

पोलिसांच्या घरांची किंमत कमी होण्याची शक्यता
बीडीडी चाळीतल्या पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना हक्काच्या घरांसाठी 50 लाखांची किंमत जाहीर करण्यात आली होती. परंतु ही किंमत कमी करण्यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार, नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिवसेना नेते वरळी, नायगांव पोलीस वसाहतीमध्ये जाऊन पोलीस कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत. 50 लाख रुपयाच्या किंमतीवरुन पोलीस परिवाराचं मत जाणून घेणार आहे.  

मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेत पोलिसांना हे घर 50 लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. परंतु यावरुन राजकारण सुरु झालं. मागील आठड्यात एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना क्वॉर्टर्स द्या पण फुकटात घर नको. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांना फुकटात घर देणं अव्यवहारिक ठरेल, असं म्हटलं होतं.



 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
Embed widget