एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील प्रसिद्ध लिंकिंग रोडवरचा बाजार उठणार
मुंबई : शॉपिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेला वांद्र्यातील लिंकिंग रोडवरचा बाजार लवकरच उठणार आहे. रस्त्यावरील फेरीवाले आणि गिऱ्हाईकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
लेटेस्ट ट्रेण्डचे फॅशनेबल कपडे आणि चपलांसाठी लिंकिंग रोडवरचा बाजार प्रसिद्ध आहे. संपूर्ण मुंबईतून इथे खरेदीसाठी येतात. मात्र फेरवाले, खरेदी करण्यासाठी आलेल्यांनी पार्क केलेल्या गाड्या यामुळे इथे कायमच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
फॅशनेबल कपड्यांची दुनिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंकिंग रोडवर एकूण 97 स्टॉलधारक आहेत. तसंच अनेक अनधिकृत फेरीवालेही आहेत. यापैकी परवानाधारक फेरीवाल्यांना जवळच्याच पटवर्धन पार्क ट्रॅफिक आयलँडवर स्थलांतरित करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement