एक्स्प्लोर
मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर 2059 पर्यंत टोलधाड?
![मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर 2059 पर्यंत टोलधाड? Mumbai Bandra Worli Sea Link Toll Paying Likely To Continue Till 2059 Live Update मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर 2059 पर्यंत टोलधाड?](https://static.abplive.com/abp_images/532796/thumbmail/Bandra%20Worli%20Sea%20Link.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवरची टोलवसुली आणखी 20 वर्षांनी वाढवण्याचा विचार एमएसआरडीसी करत आहे. सी लिंकच्या खर्चाची वसुली आणि प्रस्तावित प्रकल्पांचा तुटवडा भरुन काढण्यासाठी 2059 पर्यंत टोल आकारला जाण्याची चिन्हं आहेत.
2039 साली सी लिंकच्या टोलवसुलीचा करार संपणार आहे. मात्र अशाच पद्धतीनं टोलवसुली सुरु राहिल्यास एमएसआरडीसीच्या इतर प्रकल्पांसाठी पैशाचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे ही वसुली आणखी 20 वर्षे पुढं ढकलण्याचा विचार एमएसआरडीसी करत आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
वांद्रे-वरळी सी लिंक उभारण्यासाठी 1 हजार 634 कोटींची खर्च आला होता. मात्र 2009 पासून आतापर्यंत फक्त 575 कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. टोलवसुलीचा नियोजित कालावधी 30 वर्षांचा (2039 पर्यंत) आहे, मात्र तो वाढवून 50 वर्षांसाठी (2059 पर्यंत) करण्याच्या हालचाली आहेत.
त्यातच एमएसआरडीसीतर्फेच वांद्रे-वर्सोवा सी लिंक उभारला जाणार आहे. त्यासाठी तब्बल 7 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्च भागवण्यासाठी ही मुदतवाढ करण्याचा विचार महामंडळ करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)