एक्स्प्लोर
आहार तज्ज्ञाला ब्लॅकमेल करणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला सापळा लावून पकडलं
मुंबई: योग आणि आहार तज्ज्ञ करुणा कोडवानी यांच्या तक्रारीवरुन सीबीआयने इनकम टॅक्सचा एक अधिकारी आणि सीएला अटक केली आहे. याप्रकरणी योग तज्ज्ञ कोडवानी यांनी आयकर विभागाचा अधिकारी नवीन कुमार आणि सीए विनय गुप्ता ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार सीबीआयला पत्र लिहून केली होती. यानंतर या दोघांनाही सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत.
करुणा कोडवानींनी सीबीआयला दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाचा अधिकारी नवीन कुमार आणि सीए विनय गुप्ता इनकम टॅक्सच्या असेसमेंटसाठी 10 लाखांची लाच मागितली होती. ही रक्कम न दिल्यास मोठी कारवाई करण्यात येईल असे या दोघांकडून सांगितले जात होते.
यानंतर कोडवानी यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने सीबीआयकडे 29 डिसेंबर रोजी मदत मागितली. कोडवानी यांच्या तक्रारीची दखल घेऊन सीबीआयने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, अन् दोघांनाही सापळा लावून अटक केली आहे.
दरम्यान, या दोघांनाही अटक केल्यानंतर न्यायलयात हजर केले असता, न्यायालयाने या दोघांनाही 13 जानेवारीपर्यंत न्यायालयिन कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement