(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Andheri Fire Live Updates : अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Mumbai Andheri Fire Live Updates : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे.
LIVE
Background
Mumbai Andheri Fire Live Updates : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या आहेत. सिनेमाच्या सेटमधील बहुतांश सामान ज्वलनशील असल्याने आग वेगानं पसरली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय.
या आगीच्या घटनेमध्ये अद्याप कोणतीही दुखापत अथवा कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाल्याची नोंद झालेली नाही. आगीमुळे सेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आग लागल्याने विरा देसाई रोड येथील वाहतूक दत्ताजी साळवी रोडवरून जे.पी. रोड कडून आय.ओ.सी.कडे तर चित्रकूट ते थेट आय.ओ.सी. वळविण्यात आली आहे. फोर्टयार्ड ते चित्रकूट उत्तर व दक्षिण दोन्ही मार्ग बंद आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Mumbai Andheri Fire Live Updates : वाहतूकीत बदल
आग लागल्याने विरा देसाई रोड येथील वाहतूक दत्ताजी साळवी रोडवरून जे.पी. रोड कडून आय.ओ.सी.कडे तर चित्रकूट ते थेट आय.ओ.सी. वळविण्यात आली आहे. फोर्टयार्ड ते चित्रकूट उत्तर व दक्षिण दोन्ही मार्ग बंद आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Mumbai Andheri Fire Live Updates : परिसर धुराने व्यापला
आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला असून सध्या त्या सेटवर किती लोक अडकले आहेत, किती जणांची सुटका करण्यात आली आहे, ही माहिती समोर आलेली नाही. मात्र आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
Mumbai Andheri Fire Live Updates : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाच्या सेटला आग
प्राथमिक माहितीनुसार, चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट 'लव रंजन'चा सेट उभारण्यात आला होता. सेट वर लाईटिंगचे काम सुरू होते त्यावेळी आग लागली आहे. पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती. शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट होते. त्याला आग लागलेली नाही. चित्रपटाचे नाव निश्चित नसून काही दिवसापूर्वी त्याचे शुटिंग पॅरिसला झाले. सेटचे काम सुरू असल्याने मोठ्या संख्या मध्ये कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे
Mumbai Andheri Fire Live Updates : फायर कॉलिंगचे काम सुरू
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानाकडून फायर कॉलिंग चे काम सुरू आहे.
Mumbai Andheri Fire Live Updates : शॉर्टसर्किटमुळे आग
भीषण आगीमध्ये संपूर्ण फिल्म शूटिंगचे स्टुडिओ जळून खाक झालं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे.