Mumbai Plane Crash : मुंबईत खासगी विमान कोसळलं, लॅंडिंग करताना दोन तुकडे; तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती
Mumbai Plane Crash : खराब हवामानामुळे विशाखापट्टनमवरून मुंबईला येणारे विमान लॅंडिंगवेळी क्रॅश झालं. त्यामध्ये एकूण आठजण प्रवास करत होते.
मुंबई : मुंबई विमानतळावर खासगी विमान (VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL) कोसळलं आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या एअरक्राफ्टमधून प्रवास करत असलेल्यांपैकी तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. हे विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होतं.
प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंग करताना ही दुर्घटना (Mumbai Plane Crash) घडल्याचं सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्ससह 8 जण प्रवास करत होते.
#WATCH | VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL operating flight from Visakhapatnam to Mumbai was involved in runway excursion (veer off) while landing on runway 27 at Mumbai airport. There were 6 passengers and 2 crew members on board. Visibility was 700m with heavy rain. No… pic.twitter.com/KxwNZrcmO5
— ANI (@ANI) September 14, 2023
नेमकी दुर्घटना कशी झाली?
हे खासगी विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईकडे येत होतं. मुंबईत सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सध्या खराब हवामान आहे. विमानाचं जेव्हा लँडिंग होत होतं, त्यावेळी विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे खासगी विमान कोसळलं आणि भीषण दुर्घटना घडली.
Rakhi Sawant Share Video : राखी सावंतने शेअर केला व्हिडीओ
मुंबईत चार्टर विमान घसरल्याने दिल्लीहून मुंबईच्या दिशेने येणारी अनेक विमाने अडकून पडली असल्याची माहिती आहे. अभिनेत्री राखी सावंतही एका फ्लाइटमध्ये आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये फ्लाइट अटेंडंट ही राखीला मुंबई विमानतळाची अवस्था सांगत असल्याचे ऐकू येत आहे.
या विमान दुर्घटनेमुळे मुंबईत येणारी आणि मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी जवळपास 50 विमाने प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर येत आहे.
There must be over 50 aircraft (if not more) waiting for operations at #Mumbai - @CSMIA_Official to resume (which have been suspended due to a plane crash). If you are flying today, please be patient. The delays / cancellations and/or diversions are unintentional.#AvGeek pic.twitter.com/jATdI9BrZA
— VT-VLO (@Vinamralongani) September 14, 2023
ही बातमी वाचा: