![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Accident News: लपाछुपी खेळताना गळ्यात दोरी अडकली अनर्थ घडला, मुंबईत 9 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Mumbai Accident News: लपाछुपी खेळत असताना एका ९ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
![Mumbai Accident News: लपाछुपी खेळताना गळ्यात दोरी अडकली अनर्थ घडला, मुंबईत 9 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू Mumbai Accident News 9-year-old girl tragically died in Mumbai when a rope stuck around her neck while playing hide-and-seek Mumbai Accident News: लपाछुपी खेळताना गळ्यात दोरी अडकली अनर्थ घडला, मुंबईत 9 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/30/cbc23879fd845e4bceaf24ad947376e21722309585193442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मुंबईतून एक हदयद्रावक घटना समोर आली आहे. लपाछुपी खेळत असताना एका ९ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू (Accident News) झाल्याची घटना समोर आली आहे. खेळत असताना जिन्यावरील दोरीला गळफास लागून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शिवाजीनगर परिसरात घडली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरात आपल्या भावंडांसोबत लपाछुपी खेळत असताना दोरीचा फास लागल्याने (Accident News) आकृती सिंह नावाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास मुलीच्या गळ्यात (Accident News) अडकला. मोठ्या बहिणीने तत्काळ घराबाहेर धाव घेत शेजाऱ्यांना कळवलं. मुलीची आई आणि शेजाऱ्यांनी मिळून मुलीची सुटका केली. मात्र, उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)