एक्स्प्लोर
क्षुल्लक वादाचा राग, मुंबईत 73 वर्षीय वृद्धेची नदीत उडी

मुंबई : कुटुंबासोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग डोक्यात घालून एक वृद्धा टोकाचं पाऊल उचलायला निघाली होती. सुदैवाने मुंबईतील मिठी नदीत जीव देण्यासाठी उडी मारलेल्या आजीबाईंचे प्राण बचावले आहेत.
कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या 73 वर्षीय महानंदा बुटले या दहिसरच्या यशवंत तावडे मार्गावर राहतात. त्यांचे 27 तारखेला घरी क्षुल्लक कारणावरुन भांडण झालं. त्याच रागात त्यांनी दहिसरच्या मिठी नदीत उडी मारली.
ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुटले आजींना बाहेर काढलं.
मंगळवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने मिठी नदीच्या पाण्याला अधिक वेग होता. आजींना वेळेत बाहेर काढले नसते तर पाण्यात बुडून त्यांचा जीव जाण्याची भीती होती.
महानंदा बुटले यांना स्थानिक करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलं.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















