एक्स्प्लोर
बीएमसीने खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. कुर्ला पश्चिमेच्या जागृतीनगर भागात सकाळी साडे अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली.
मोहम्मद अली असं या मुलाचं नाव असून डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
महापालिकेकडून जागृतीनगरमध्ये शौचालयाच्या नाल्याच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले होते. याच खड्ड्यात पडून सहा वर्षांच्या मोहम्मद अलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सध्या या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. खड्डे खोदल्यानंतर संबंधित परिसरात बॅरिकेट्स लावले नव्हते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement