एक्स्प्लोर
मोबाईल चोराचा पाठलाग करताना धावत्या लोकलमधून उडी, प्रवाशाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू
शकील शेख फार विचार न करता चोराला पकडण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उतरले. परंतु तोल गेल्याने ते प्लॅटफॉर्मवरुन घसरुन रुळावर पडले आणि तीच ट्रेन त्यांच्यावरुन गेली.
मुंबई : मोबाईल फोन चोराचा पाठलाग करताना, लोकल ट्रेनमधून पडल्याने एका 52 वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्टेशनवर रविवारी सकाळी ही घटना घडली. शकील शेख असं मृत व्यक्तीचं नाव असून ते गोरेगावला राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे.
चर्चगेटला जाणारी धीमी लोकल रविवारी सकाळी 6.45 च्या सुमारास चर्नी रोड स्टेशनवर पोहोचली. ताज हॉटेलमध्ये नोकरी करणारे शकील शेख त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत ट्रेनमध्ये होते. मात्र त्याचवेळी अज्ञात व्यक्ती डब्यात चढला. शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काही समजण्याआधीच चोराने डाव साधत, त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला.
यानंतर शकील शेख फार विचार न करता चोराला पकडण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उतरले. परंतु तोल गेल्याने ते प्लॅटफॉर्मवरुन घसरुन रुळावर पडले आणि तीच ट्रेन त्यांच्यावरुन गेली. या घटनेत शेख यांना गंभीर इजा झाली होऊन अतिशय रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आम्ही तीन संशयितांची ओळख पटवली आहे. चोराचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त एस आर गांधी यांनी दिली. आरपीएफ आणि जीआरपी संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्लॅटफॉर्मवर चोराचा पाठलाग करणं प्रवाशांनी टाळावं, असं आवाहन एस आर गांधी यांनी केलं आहे. प्रवाशांनी स्टेशनवर उतरुन पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करावी, असंही त्यांनी सांगितलं.
चर्नी रोड स्टेशनवर दोन दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होतं. याचा अर्थ अशा प्रकारच्या घटना इथे सातत्याने होत असतात, असा दावा शकील शेख यांचे सहकारी प्रीतेश त्रिपाठी यांनी केला आहे. तर एस आर गांधी यांना हा दावा फेटाळत मागील काही महिन्यातील ही पहिलीच घटना असल्याचं त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement