एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या झवेरी बाजारातील तीन मोठ्या ज्वेलर्सवर छापा
मुंबई : मुंबईत आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. झवेरी बाजारातील तीन मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा पांढरा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
चेनाजी नरसिंहजी ज्वेलर्स, देव बुलियन आणि श्री बुलियन या तीन ज्वेलर्सवर आयकर विभागाना छापा टाकला आहेत.
या दुकानांच्या मालकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा कर्मचाऱ्याच्या खात्यात टाकून त्यांच्याकडून चेक घेतला. मात्र आम्ही सोन्याची विक्री केल्याचा दावा ज्वेलर्स करत आहेत. परंतु विकलेल्या सोन्याचा हिशेब मात्र त्यांना देता आला नाही.
आयकर विभागाने आज सकाळी छाप्याला सुरुवात केली. सुमारे 100 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. मात्र हा आकडा 500 कोटी रुपये असू शकतो, असा आयकर विभागाचा अंदाज आहे.
या तीन ज्वेलर्सवर छापा
- चेनाजी नरसिंहजी ज्वेलर्स
- देव बुलियन
- श्री बुलियन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement