एक्स्प्लोर
भांडुपमध्ये कॉलेजबाहेर 17 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
आज (26 जुलै) सकाळी नऊच्या सुमारास आरोपी सुशीलला घेऊन महाविद्यालयाबाहेर आले.
मुंबई : भांडुपच्या श्रीमती रामकली सन्मान सिंग महाविद्यालयाबाहेर एका 17 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. सुशील वर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज (26 जुलै) सकाळी नऊच्या सुमारास आरोपी सुशीलला घेऊन महाविद्यालयाबाहेर आले. त्यानंतर सुशीलला काही अंतरावर नेलं. तिथे सुशीलची मुलांसोबत झटापट झाली. मग या टोळक्यातील एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि सर्व जण तिथून पसार झाले.
या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांनी सुशीलला महालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भांडुप पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement