(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मोहन डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट नोट लिहिली होती. तपासणीतही सुसाईट नोटमधील हस्ताक्षर हे मोहन डेलकर यांचेच हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्यमहत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेकांची नावं लिहिली होती. या प्रकरणी मोहन देलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट नोट लिहिली होती. तपासणीतही सुसाईट नोटमधील हस्ताक्षर हे मोहन डेलकर यांचेच हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेलकर यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचे हस्ताक्षर ओळखले आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीनेही पडताळणी करण्यात आली आहे. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने देलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यात डेलकर यांनी आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे मात्र अद्याप मुख्य अहवाल येणे बाकी आहे. मोहन डेलकर यांच्या कुटुंबियांच्या फिर्यादीनंतर याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार
मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती. डेलकर यांच्या सुसाईड नोटचा उल्लेख अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला होता. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. डेलकर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
मोहन डेलकर यांना अनेक स्थानिक कार्यक्रमात त्यांना बोलवले जात नव्हते. मोहन देलकर यांना वेळोवेळी अपमानित केले जात होते. याबाबत त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. यावेळी काही स्थानिक अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. या संदर्भात त्यांनी नितीश कुमार यांची भेटही घेतली होती. यावर एक समिती स्थापन केली होती. मात्र त्या पूर्वीच मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी देलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. गुजराती भाषेत ही सुसाईड नोट लिहिली होती.
Mohan Delkar Death | दादरा, नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या
मोहन डेलकर कोण आहेत?
मोहन डेलकर याचं वय 58 वर्षांचं होतं. वर्ष 1989 मध्ये ते दादरा आणि नगर लोकसभा क्षेत्रातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ट्रेड युनियन नेता म्हणून केली होती. ते काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय नवशक्ती पार्टी (बीएनपी) ची स्थापना केली होती.
मोहन डेलकर यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत ते निवडून आले होते. गेल्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मोहन डेलकर यांनी दादरा आणि नगर हवेली येथील स्थानिक निवडणुकांसाठी जेडीयूशी करार केला होता. जेडीयूला पाठिंबा दर्शविल्यामुळे दादरा आणि नगर हवेलीमधील स्थानिक मतदानात भारतीय जनता पक्षाला जागा गमवावी लागली होती.