एक्स्प्लोर

Motivational Story of Pratiksha Tondwalker : जिथे सफाई कामगार म्हणून नोकरीची सुरुवात, तिथेच मॅनेजर पदांपर्यंत झेप

एक सफाई कर्मचारी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झालेल्या प्रतिक्षा तोंडवळकर आजच्या तारखेला एसबीआयमध्येच असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. पण सफाई कर्मचारी ते असिस्टंट जनरल मॅनेजर इथवरचा त्यांचा स्वप्नवत प्रवास साधा-सोपा नव्हता.

Pratiksha Tondwalker : 'मेहनत करने वालोंकी कभी हार नही होती!' ही एक प्रसिद्ध हिंदी कविता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. असाच प्रेरणादायी आहे, पुण्याच्या प्रतिक्षा तोंडवळकर यांचा प्रवास. एक सफाई कर्मचारी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झालेल्या प्रतिक्षा आजच्या तारखेला एसबीआयमध्येच सहायक महाप्रबंधक म्हणजेच असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) आहेत. पण सफाई कर्मचारी ते असिस्टंट जनरल मॅनेजर इथवरचा त्यांचा स्वप्नवत प्रवास साधा-सोपा नव्हता. प्रयत्नांची आणि अहोरात्र मेहनतीची साथ या स्वप्नांना मिळालं आणि हे सारं साकार झालं. तर नेमकं प्रतिक्षा यांनी हे सारं कसं मिळवलं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या जीवनप्रवासावर एक नजर...

अत्यंत गरीब घरात जन्म झालेल्या प्रतिक्षा यांचा विवाहही तत्कालीन सामाजिक व्यवस्थेनुसार लवकरच झाला. 1964 साली जन्मलेल्या प्रतिक्षा यांचा विवाह 17 वर्षांच्या असताना 1981 साली झाला. घरची परिस्थिती खास नसल्याने सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रतिक्षा या लग्नबंधनात अडकल्या. पती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बायंडरचं काम करत होते. पण 1984 साली पतीचं निधन झालं आणि प्रतिक्षा अगदी एकट्या पडल्या. पण परिस्थितीशी न घाबरता त्यांनी पती कामाला असलेल्या SBI बँकेत स्वीपर म्हणून कामास सुरुवात केली. टेम्पररी नोकरीला लागलेल्या प्रतिक्षा यांनी काम करत करत अभ्यासही सुरु ठेवला. कारण पुढच्या पदावर आणि कायमस्वरुपी नोकरीसाठी शिक्षण हा एकच मार्ग असल्याचं प्रतिक्षा यांना कळालं होतं.

क्लर्क ते मॅनेजर 

पुढे जाण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याने प्रतिक्षा यांनी कामासोबत अहोरात्र अभ्यास करत फर्स्ट क्लासमध्ये दहावी पास केली. ज्यानंतर बँकेतच त्यांना मेसेन्जर म्हणून काम मिळालं. काम करतानाच पुढील शिक्षण सुरु ठेवत त्यांनी एसएनडीटी महाविद्यालयातून ग्रॅज्युवेशनही पूर्ण केलं. ज्यानंतर काही काळातच त्यांना क्लर्कची नोकरी मिळाली. क्लर्क असणाऱ्या प्रतिक्षा मग अंतर्गत परिक्षांतून पहिल्याच प्रयत्नात ट्रेनी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाल्या. ज्यानंतर पुन्हा मागे वळून त्यांनी पाहिलचं नाही. एक-एक पायरी चढत त्या ऑफिसर पदावर पुढे पुढे पोहोचत होत्या. ज्यानंतर आता थेट असिस्टंट जनरल मॅनेजरची पदवी प्रतिक्षा यांना मिळाली असून आता लवकरच त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत AGM पोस्टवर असतील. त्यामुळे एकेकाळी स्वीपर म्हणून कामाला असणाऱ्या बँकेतच थेट असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रतिक्षा यांची कहाणी खरचं अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्यातून परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत घेतल्यावर एकदिवस यश नक्कीच मिळतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 

मुलानांही दिलं अव्वल दर्जाचं शिक्षण
 
तर प्रतिक्षा यांचा हा स्वप्नवत प्रवास दिसायला सोपा वाटत असला तरी यात त्यांनी घेतलेली मेहनत ही उल्लेखणीय आहे. विशेष म्हणजे या दरम्यान त्यांनी कौटुंबिक जबाबदारीही तितक्याच शिताफीनं सांभाळली. प्रतिक्षा यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. यात त्यांचा मुलगा विनायक याने मुंबईतून बॅचलर ऑफ इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी पवईमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ज्यानंतर तोही पुण्यातील एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. तर मुलगी दिक्षा ही बेकर असून दुसरा मुलगा आर्य सध्या शिक्षण घेत आहे. त्यामुळे प्रतिक्षा यांनी स्वत:च्या कामावर लक्ष देत असतानाच घरची जबाबदारीही तितकीच चांगली सांभाळल्याचं दिसून येतं आहे.  तर अशाप्रकारे जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात हवं ते साध्य करता येऊ शकतं हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget