एक्स्प्लोर

नवाब मलिकांच्या गंभीर आरोपानंतर मोहित कंबोज उत्तर देणार, काही वेळात पत्रकार परिषद

Mohit Kamboj Press Conferance : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना पत्रकार परिषदेतून मोहित कंबोज प्रत्युत्तर देणार आहेत.

Mohit Kamboj Press Conferance : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आज नवा गौप्यस्फोट केला. मुंबई क्रूझ ड्रग्ज (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणाबाबत बोलताना हे संपूर्ण प्रकरण अपहरणाचं असल्याचं नवाब मलिकांनी दावा केला. तसेच आर्यन खान स्वतः तिकीट काढून क्रूझवर गेला नव्हता, तर आर्यन क्रूझवर यावा म्हणून मोहित कंबोज यांच्या मेहुण्यानं षडयंत्र रचलं होतं, असा आरोप मलिकांनी केला आहे. मलिकांच्या या खळबळजनक आरोपांनंतर मोहित कंबोज पत्रकार परिषद घेणार असून नवाब मलिकांच्या सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत. 

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर : नवाब मलिक 

आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांनी म्हटलं की, 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही, असंही ते म्हणाले. 

नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, मोहित कंबोज हा 1700 कोटी रुपये भ्रष्टाचार करणारा हा व्यक्ती आहे. सध्या भाजपमध्ये असलेले आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणाऱ्या एका नेत्यामागे हा फिरत असायचा. त्यानंतर सरकार बदललं आणि तो भाजपमध्ये गेला. दीड वर्षापूर्वी सीबीआयची छापेमारी करण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्यात आले.

नवाब मलिक यांनी म्हटलं की,  18 कोटींचं प्रकरण समोर आलं आहे. प्रभाकर सैल याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब दिला आहे. सध्या समीर वानखेडे यांना वाचण्यासाठी मोहित कंबोज आणि सॅम डिसुझा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत.

सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही : नवाब मलिक 

नवाब मलिकांनी सांगितलं की, सुनील पाटील याला मी कधीही भेटलो नाही. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. सुनील पाटील हा भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला मिळत आहेत. तो कोणत्या पार्टीचा व्यक्ती आहे हे मी बोलत नाही, असं मलिक म्हणाले. सुनील पाटील हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत. 6 तारखेला पाहिल्यादा मला सुनील पाटीलचा फोन आला. तो येतो बोलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील फोन आला मात्र तो आला नाही. तो आज येणार होता परंतु आज अखेर तो आलेला नाही, असंही मलिक म्हणाले.

सॅम डिसुझाने हवाला मार्फत दिल्लीला पैसे पाठवले : नवाब मलिक 

नवाब मलिकांनी सांगितलं की,  एक केस झाली होती. व्हीट बॅकरी केस मध्ये सचिन टोपे आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सॅम डिसूजाला 23 जूनला एक नोटीस देण्यात आली होती. एनसीबीच्या वतीने हजर होण्यासाठी मात्र तो आज अखेर तो आलेला नाही. 23 जून पासून आज अखेर त्याची अटक का झाली नाही? 5 महिने याला अटक झाली नाही आणि आता तो समीर वानखेडे यांना क्लिनचिट देत आहे. हा दोन व्यक्तींसोबत काम करतो एक राजीव बजाज आणि दुसरा आहे प्रदीप नाम्बियार. हे दोघे पत्रकार आहेत. हे दोघे वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचे भाग आहेत. सॅम डिसुझाने हवाला मार्फत दिल्लीला पैसे पाठवले. तो हवाला सोबत फोनवर बोलत होता की मला हवालाची पावती द्या. हवालावाला त्याला म्हणतो हवालाची कधी पावती मिळते का?

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
एकीकडे आशिया कपची फायनल त्याच दिवशी बीसीसीआयमध्ये निवडणूक, नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार, कोण बाजी मारणार?
एकीकडे आशिया कपची फायनल त्याच दिवशी बीसीसीआयमध्ये निवडणूक, नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
एकीकडे आशिया कपची फायनल त्याच दिवशी बीसीसीआयमध्ये निवडणूक, नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार, कोण बाजी मारणार?
एकीकडे आशिया कपची फायनल त्याच दिवशी बीसीसीआयमध्ये निवडणूक, नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! भरधाव कार महिलेला उडवणार तोच मदतीसाठी धावल्या पण आक्रीत घडलं, महिलेला कारनं  फरफटत नेलं
रायगडमध्ये भीषण अपघात! भरधाव कार महिलेला उडवणार तोच मदतीसाठी धावल्या पण आक्रीत घडलं, महिलेला कारनं फरफटत नेलं
Marathwada Ganapati Visarjan: मराठवाड्यात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात; मिरवणुका सुरु झाल्या, उत्साह शिगेला
मराठवाड्यात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात; मिरवणुका सुरु झाल्या, उत्साह शिगेला
सोन्याच्या दरानं ग्राहकांना दिला झटका, 22 कॅरेट सोनं एका लाखांवर, तर 24 कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्याच्या दरानं ग्राहकांना दिला झटका, 22 कॅरेट सोनं एका लाखांवर, तर 24 कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Embed widget