एक्स्प्लोर
Pawar Politics: 'कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत नाही', शरद पवारांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. वाय बी चव्हाण सेंटर येथे झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करायची नाही, असे स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, 'कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपाच्या सोबत जायचं नाही'. याशिवाय, निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना मूळ ओबीसींनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. जर मूळ ओबीसी उमेदवार उपलब्ध नसेल, तरच मराठा समाजातील ज्यांना पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा इच्छुकांना संधी देण्याचा विचार व्हावा, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे पक्षाची आगामी निवडणुकीतील भूमिका स्पष्ट झाली आहे.
महाराष्ट्र
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















