Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शरीरात कोविड डेड सेल्स सापडल्या, शस्त्रक्रिया पुढे ढकलली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांच्यावर बुधवारी हिप बोनची शस्त्रक्रिया होणार होती.
![Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शरीरात कोविड डेड सेल्स सापडल्या, शस्त्रक्रिया पुढे ढकलली MNS Raj Thackeray Hip Bone Surgery Covid dead cells were found in body surgery postponed Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शरीरात कोविड डेड सेल्स सापडल्या, शस्त्रक्रिया पुढे ढकलली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/10/23b23209465fca52eb5b0f8dd1dadc25_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या होणारी शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
कोविडच्या डेड सेल्स सापडल्या, पण हा कोरोना नाही
बुधवारी राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी ते मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्या विविध वैद्यकीच तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळलं. या सेल्स डेड असल्याने त्यांना कोरोनाची लागण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळेच आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून राज ठाकरे आता त्यांच्या घरी परतले आहेत.
राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, 1 जूनला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही."
टेनिस खेळताना दुखापत
मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उद्या लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल.
अयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे 15 दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. हे दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला. परिणामी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)