एक्स्प्लोर
ही भिंत आमची, भाजपची जाहिरात मनसैनिकांनी पुसली

मुंबई : शिवसेना-भाजपमधील श्रेयवादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत दादरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात मनसैनिकांनी पुसली आहे. कोहिनूर टॉवरची भिंत पक्षाची असल्याचा दावा करत मनसेने भाजपची जाहिरात हटवली. शिवसेना भवनासमोरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर आधी मनसेची जाहिरात होती. मात्र ही जाहिरात पुसून भाजपने शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत मोदींची जाहिरात लावली. यामुळे आक्रमक झालेल्या मनसेने भाजपची जाहिरात पुसली.
आणखी वाचा























