MNS on Uddhav Thackeray : गेट वेल सून मामू... म्हणत मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
MNS on Uddhav Thackeray : मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील, मनसेकडून उद्धव ठाकरेंना खोचक टोला
MNS on Uddhav Thackeray : सध्या दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे गट (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे गट (CM Eknath Shinde) असा संघर्ष शिवसेनेत (Shiv Sena) सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे (Maharashtra Navnirman Sena) असं वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या गटप्रमुख मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटाला चांगलंच फैलावर घेतलं होतं. त्यासोबतच ठाकरेंनी मनसेलाही टोला लगावला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुन्नाभाई असा उल्लेख केला होता. त्याला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गेट वेल सून मामू, म्हणत उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधण्यात आला आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी खोचक ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गजानन काळे यांनी एक ट्वीट केलंय. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, "आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. 2012 ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या 7 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू."
गटप्रमुखांच्या मेळाव्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
"मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणार्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही.", असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पुढे बोलताना, "आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई पालिका जिंकण्यासाठी स्वत: पंतप्रधान उतरत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गृहमंत्री आहेतच. आपले गद्दार आहेतच. मुन्नाभाईही आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत.", असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :