Sandeep Deshpande Press Conference : संदीप देशपांडे आज कोरोना काळातील बीएमसीमधील कथित घोटाळ्याचा पुराव्यांसह गौप्यस्फोट करणार
Sandeep Deshpande Press Conference : कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. पण पहिल्यांदाच मनसे पुराव्यांसहित हा कथित भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Sandeep Deshpande Press Conference : कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) दिलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. पण पहिल्यांदाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुराव्यांसहित हा कथित भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळी अकरा वाजता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हे मुंबईतील (Mumbai) विद्याधर हॅालमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी स्क्रीन लावण्यात येणार आहे आणि या स्क्रीनवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले जाणार आहेत. आता नेमका संदीप देशपांडे यांचा निशाणा कोणावर असणार आहे? या पुराव्यांमध्ये नेमकं काय असणार आहे आणि या पुराव्यानंतर आरोप झालेल्या लोकांवर कारवाई होणार का? हे पाहावं लागेल.
या पत्रकार परिषदेबाबत मनसे संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. भेटू सकाळी 11 वाजता असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. सोबतच एक फोटो शेअर केला आहे. त्यावर "कोरोनाव्हायरस स्कॅम... विरप्पन गँगचा सर्वात मोठा घोटाळा! मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची पुराव्यासकट पत्रकार परिषद," असं लिहिलं आहे.
भेटूया सकाळी 11वाजता pic.twitter.com/jJGpBr5aU6
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 22, 2023
एक व्यक्ती कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह सोडून गेला : संदीप देशपांडे
दरम्यान, संदीप देशपांडी यांनी शनिवारी (21 जानेवारी) पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेतील घोटाळा पुराव्यांसह उघड करणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "तीन दिवसांपूर्वी आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह (Pen Drive) ठेवून गेला. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आहे. हे सगळं सोमवारी जाहीर करणार आहे. त्याचप्रमाणे, या पेन ड्राईव्हमध्ये मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं होतं. विरप्पन गॅंगमध्ये कोण आहेत त्यांची नावं देखील सोमवारी समोर येतील असं संदीप देशपांडे यांनी म्हणाले होते.
ACB कडे तक्रार दाखल करणार : संदीप देशपांडे
कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचा पेन ड्राईव्ह हाती लागल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं. या पेन ड्राईव्हमध्ये बँक खात्यांचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. कशा पद्धतीने मुंबईची लूट करण्यात आली हे आपण सोमवारी उघड करणार आहे. तसंच या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात Anti Corruption Bureau (ACB) कडे करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातमी