एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हिंदुत्वाचं ज्वलंत भाषण करण्याची क्षमता ना उद्धव ठाकरेंमध्ये ना एकनाथ शिंदेंमध्ये; मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल 

Shiv Sena : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दसरा मेळाव्यावरून हल्लाबोल केला आहे.

मुंबई : हिंदुत्वाचं ज्वलंत भाषण करण्याची क्षमता ना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये आहे, ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये आहे, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी लगावाला आहे. दसरा मेळाव्यावरून (DASARA MELAVA) शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आला  आहे. दर  वर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. या वर्षी देखील शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. परंतु, पालिकेकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्यासाठी पालिककडे अर्ज केलाय. यावरूनच संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. 

संदीप देशपांडे यांनी पत्रक काढून हा हल्लाबोल केला आहे. "बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ 'एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते' हा चमत्कार अवघ्या जगात कुठे  पहायला मिळाला असेल तर तो इथेच, आपल्या शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी मराठी जनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत येत आणि हिंदुहृदसम्राटांकडून मिळालेलं राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं 'बाळकडू' व विचारांचं सोनं घेऊन घरी परतत. दुर्दैवाने वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुहृदसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे. 

"ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले त्याच राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. इतकं सगळं करूनही स्वत:चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाही, असा हल्लाबोल या पत्रकातून करण्यात आलाय.  

संदीप देशपांडे यांनी म्हटले की, "इतर वेळी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं. पण आता  बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार" असं म्हणत 'यू टर्न' आणि 'बंडखोर' असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठी जनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही. ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा आणि मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?".  

"बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. त्यामुळे कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं आहे.  

महत्वाच्या बातम्या

Dasara Melava : ठाकरेंच्या कोडींसाठी शिंदेंचा प्लॅन 'बी', दसरा मेळाव्यासाठी मुंबईतली प्रमुख मैदानं बुक करण्याची तयारी 

दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडून अखेर मुंबई महापालिकेत अर्ज, शिवाजी पार्क मैदानासाठी सदा सरवणकरांचा अर्ज 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुलीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget