एक्स्प्लोर

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवलं, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

राज्यातल्या 13 जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी हे गुजरातच्या शेतीला दिलं जात आहे. मोदी आणि शाह जोडीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी दिलं आहे, असा गंभीर आरोप नितीन भोसले यांनी केला आहे.

मुंबई : राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भीषण असताना महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला दिलं जात असल्याचा आरोप मनसेने मुख्यमंत्र्यांवर केला आहे. राज्यात दुष्काळ असतानाही 46 टीएमसी पाणी गुजरातला वळवलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिली खोटी माहिती दिली असल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. राज्यातल्या 13 जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी हे गुजरातच्या शेतीला दिलं  जात आहे. मोदी आणि शाह जोडीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी दिलं आहे, असा गंभीर आरोप नितीन भोसले यांनी केला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पाणी देण्याचा असा कोणताही करार झाला नाही. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही भोसले म्हणाले. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रासाठी साठवून परत वळवावं. गुजरातला वाहून जाणार पाणी न अडवून मुख्यमंत्री मोदी शहा यांना खुश करत आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांशी अनेकदा बोलणं झालं आहे. पण आमच्याकडे पैसा नसल्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. केंद्र जेव्हा पैसा देईल तेव्हा आम्ही विचार करू, असे मुख्यमंत्री म्हणाले असल्याचे भोसले म्हणाले. दरम्यान या पाण्यासाठी नितीन भोसले 13 दुष्काळी जिल्ह्यात जात पाणी यात्रा काढणार आहेत. काय आहे महाराष्ट्र-गुजरात पाणीवाद? केंद्र शासनाकडून दमणगंगा-साबरमती नदी जोड प्रकल्पाद्वारे 35 दशलक्ष घनफूट पाणी हे गुजरातमधील खंबाट धरणामध्ये सोडले जाणार आहे. तसेच नार-पार नदी, अंबिका आणि आरंगा खोऱ्यातून तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाद्वारे 21 दशलक्ष घनफुट पाणी हे गुजरातमधील खच्छ, भूज आणि सौराष्ट्रमधील सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राचे हक्काचे तब्बल 1,330 दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातच्या मधुबन धरणात पोहचवून पुढे कच्छ व सौराष्ट्रातही पाठवले जाणार आहे. महाराष्ट्राचं पाणी गुजरातमध्ये 600 किलोमीटर आतपर्यंत पोहोचवले जाऊ शकते. परंतु नद्यांपासून, जल साठ्यांपासून अवघ्या 100 किलोमीटरवर असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाणी का पोहोचू शकत नाही? असा सवाल महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Function Special Report तीन सोहळे, साधेपणा; अनोखं लग्न, वरातीचा थाट आणि केळवण
Tiger Fake Viral Video: वाघाच्या हल्ल्याचा AI व्हिडिओ, समाजकंटकांवर होणार कारवाई Special Report
Jarange vs Munde: 'संतोष देशमुखच्या हत्येनंतर माझा नंबर होता', गंगाधर काळकुटेंचा गौप्यस्फोट
Maratha Reservation: 'सातारा गॅझेटियरमुळे लवकर न्याय', Shivendraraje Bhosale यांचा मोठा दावा
Atal Setu Under Fire: 'फेकनाथ मिंधे, भाजप सरकार भ्रष्टाचारानं माखलंय', आदित्य ठाकरेंचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
Embed widget