एक्स्प्लोर
दूध आंदोलनात मनसेचीही उडी, दुधाच्या गाड्या परत पाठवल्या
मनसे कार्यकर्त्यांनी पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील वसुधरा कंपनीच्या गेटवर येणाऱ्या गाड्या परत पाठवल्या.
पालघर : दूधप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दोषी धरल्यानंतर मनसे कार्यकर्तेही आता दूध आंदोलनात उतरले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील वसुधरा कंपनीच्या गेटवर येणाऱ्या गाड्या परत पाठवल्या.
राजू शेट्टी यांच्या आंदोलनात आता मनसेनेही उडी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभर सुरु असलेल्या दूध आंदोलनाला सरकार जबाबदार आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरेंनी आंदोलनावर आपली भूमिका मांडताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र सरकारचा कारभार केंद्रातून चालवला जातोय, असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
राजू शेट्टींचं पालघरमध्ये ठिय्या आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पालघरच्या बोईसरमधील अमूल दूध डेअरीबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मुंबईला दूध पुरवठा करु नये अशा विनंतीनंतरही अमूलचा दूध पुरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला आणि त्याविरोधात त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात दूध आंदोलन तापलं आहे. मात्र अद्याप दिल्लीपासून नागपूरपर्यंत दूध उत्पादकांच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. यामुळे मुंबई आणि पुण्यासह शहराच्या दूध पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तर गुजरातच्या दूध उत्पादकांनी महाराष्ट्रात दूधच पाठवलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement