एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मनसेकडून महापौरांना महिलांसोबत कसं वागावं याचे धडे देणारं पुस्तक भेट

मुंबईच्या महापौरांनी त्यांचा निषेध करणाऱ्या महिलेचा हात पिरगळल्याचे प्रकरण मनसेने लावून धरलं आहे. महापौरांवर महिलेचा हात पिरगळल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

मुंबई : मुंबईच्या महापौरांनी त्यांचा निषेध करणाऱ्या महिलेचा हात पिरगळल्याचे प्रकरण मनसेने लावून धरलं आहे. महापौरांवर महिलेचा हात पिरगळल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्यानंतर आता मनसेने महापौरांना महिलांसोबत कसं वागलं पाहिजे याचे धडे देणारं एक पुस्तक भेट म्हणून पाठवलं आहे. आज मनसेकडून महापौरांना 'शिवछत्रपतींची स्त्री निती' हे पुस्तक भेट म्ह‌णून पाठवण्यात आलं आहे. प्रत्यक्ष महापौरांनी ही भेट स्वीकारली नाही. मात्र महापौरांच्या दालनाबाहेर जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे पुस्तक ठेवलं आहे. यावर 'महापौरांना भेट' असा संदेश लिहून ठेवला आहे. तसेच, या भेटीसोबत एक निवेदनही मनसेने महापौरांना दिलं आहे. या निवेदनात महापौरांनी आपल्या कृत्याचा पश्चाताप म्हणून त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. काय म्हटलंय मनसेच्या निवेदनात? तुम्ही मुंबईचे प्रथम नागरिक-महापौर या संविधानिक पदावर विराजमान आहात. असे असूनही महिलेचा हात धरुन पिरगळणे अशोभनीय आणि असमर्थनीय कृत्य आहे. अशा कडक शब्दांत मनसेकडून महापौरांची कानउघडणी करण्यात आली आहे. मनसेने निवेदनात म्हटलंय की, आपण शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आहोत. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिलांना मोठा मान-सन्मान होता. आपणही तसेच वागले पाहिजे. महापौरांच्या वर्तणुकीमुळे ते 'शिवनिती'नुसार शिक्षेस पात्र आहेत. महापौरांनी केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत जाहीरपणे माफी मागावी आणि स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची अरेरावी, महिलेचा हात पिरगळला सोमवारी (05 ऑगस्ट) पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ सांताक्रुझ पूर्व येथील पटेल नगरमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना स्थानिकांनी घेरलं होतं. या परिसरात तब्बल 72 तास पाणी तुंबलं होतं. मात्र, एकही लोकप्रतिनिधी येथील परिस्थिती सावरण्यास आला नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष होता. त्यातच, याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे विजेचा धक्का लागून एकाच घरातील दोघांचा (आई-मुलाचा) मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी महापौर, आमदार तृप्ती सावंत, स्थानिक नगरसेविका प्रज्ञा भुतकर यांच्यासह या परिसराची पाहणी कर‌ण्यासाठी गेले. परंतु स्थानिकांनी त्यांना परिसरात येण्यापूर्वीच रोखलं. आता तुमची गरज नाही, असे म्हणत स्थानिक महिलांनी महापौरांना चहुबाजूंनी घेरलं. परंतु, यावेळी महापौरांनी आपल्या पदाचं भान विसरत स्थानिकांसोबत अरेरावीची भाषा सुरु केली. महापौरांची स्थानिकांसोबतची अरेरावी एका व्हिडीओद्वारे समोर आली आहे. या व्हिडीओत महापौर एका महिलेचा हात पिरगळताना दिसत आहेत. दरम्यान, यावेळी महापौरांनी मला ओळखत नाहीस का तू? मी कोण आहे ते माहीत नाही का? नालायकपणा करु नको, दादागिरी चालणार नाही. असे म्हणत महापौर स्थानिकांना धमकावत होते. या व्हिडीओमुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांविरोधातला स्थानिकांमधील संताप आणखीनच वाढला आहे. व्हिडीओ पाहा व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget