एक्स्प्लोर
शिवसेना नगरसेवकाविरोधात मनसेच्या माजी नगरसेविकेचं आमरण उपोषण
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्य़ा मनसेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोहन उगले यांच्याविरोधात आमरण उपोषण सुरु केलं आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मोहन उगले यांनी चारित्र्यावरुन आक्षेपार्ह विधान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप डोईफोडे यांनी केला आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करुनही कुठलीही कारवाई न झाल्यानं डोईफोडे यांनी कल्याणच्या एसीपी ऑफिससमोर 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केलं आहे.
दरम्यान, 13 एप्रिलपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गुडघ्यावर चालत जाण्याचा निर्धार डोईफोडे यांनी केला आहे. तर शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी आरोप फेटाळले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement