Raj Thackeray on Hindi: उत्तरेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा दबाव ते हिंदीचं एकही पुस्तक विकू देणार नाही, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
Raj Thackeray on Hindi: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शाळांमधील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. एकदा हिंदी भाषा अभ्यासक्रमात आली तर नंतर काढता येणार नाही, हे आताच ठेचलं पाहिजे

Raj Thackeray oppose Hindi compulsion in Maharashtra Schools: राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेची (Hindi Language) सक्ती भविष्यात कशाप्रकारे मराठीजनांच्या (Marathi) अस्तित्वावर घाला घालू शकते, याचे धोके समजावून सांगितले. हिंदी ही मुळात देशाची राष्ट्रभाषा नाही, ती एका राज्याची भाषा आहे. पण उत्तरेतील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीच्या दबावामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीचा घाट घातला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महायुती सरकारला अनेक सवाल विचारले.
MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
1. आजची तातडीने पत्रकार परिषद बोलवली कारण राज्याचे शिक्षण धोरण हा आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे पहिली पासून हिंदी सक्तीची करणे. मी दोन पत्र काढली आहेत. उजळणी म्हणून पुन्हा ते पत्र वाचत आहे. १७ एप्रिलच पाहिलं पत्र… हिंदी सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. आम्ही पहिली पासून का शिकायची?
2. दुसऱ्या प्रांताची भाषा आम्ही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात इतर भाषेचा सन्मान राखलो जातो तसेच आमच्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे. सरकार हिंदी भाषा थोपवू पाहत असेल तर मनसे हे खपवून घेणार नाही. जाणीवपूर्वक सरकार हिंदी मराठी हा मुद्दा करत आहे का? आपली अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
3. हिंदीची सक्ती तुम्ही इतर राज्यात कराल का? मनसे महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नाही. हिंदी पुस्तक विकू देणार नाही. प्रत्येक राज्यात त्या ठिकाणी असलेल्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे. ते होणार नसेल तर संघर्ष अटळ आहे. याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल.
4. जी भाषा सक्तीची नाही, जिचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू.
5. हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे.
6. गुजरात सरकारचा जीआर आहे पहिली पासून गुजराती गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथेदेखील हिंदी भाषेची सक्ती नाही. माझी महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती आहे की, याला विरोध केला पाहिजे. शाळांनी विरोध केला पाहिजे. हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होणार नाही. गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशमध्ये नाही. मग महाराष्ट्रात सक्तीच नाही.
7. लेखक, साहित्यिक आणि कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. अन्यथा हे मराठी संपवून टाकतील.
8. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजाव. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?
9. आयएएस लॉबी हिंदी सक्तीच्या मागे आहे. माझ्याकडे ती अधिकाऱ्यांची नावे आहेत.
10. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तिसरी भाषेच्या सक्तीसंदर्भात उल्लेख नाही. तरीदेखील मुख्यमंत्री त्याचा दाखला देत असतील तर ते खोटं बोलत आहेत. माझं यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं तेव्हा ते हिंदी भाषेची सक्ती मागे घेतो, असे बोलले होते.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























