एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या वाढदिनी मनसेकडून पेट्रोल 4 रुपये स्वस्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे आज पेट्रोल 4 रुपये स्वस्त देण्यात येणार आहे.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. 14 जून 1968 रोजी जन्मलेले राज ठाकरे वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे आज पेट्रोल 4 रुपये स्वस्त देण्यात येणार आहे. मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल. राज्यभरातील अनेक ठिकाणी ही विक्री होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढ्या दरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरेंच्या वाढदिनी स्वस्त पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 15 दिवसांपूर्वीच ही माहिती दिली होती. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली होती. मनसेने फक्त टीकाच केली नाही तर एक दिवस का असेना, पेट्रोल दरात मोठी कपात करत 36 ठिकाणी 4 रुपये स्वस्त पेट्रोल देण्यात येणार आहे. मनसे सरकारमध्ये नसूनही 4 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत असेल, तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना मोदींना हे कसे शक्य नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. 24 एप्रिल ते 13 मेपर्यंत दर स्थिर कर्नाटक निवडणुकीच्या काळात 24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते.  24 एप्रिल ते 13 मे पर्यंत मुंबईतील पेट्रोलचे दर 82.48 रुपये इतके होते. मात्र जसे कर्नाटकात मतदान संपले, तसे 14 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. 14 मे रोजी पेट्रोल प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 21 पैशांनी महागलं होतं. इंधनाचे दर दररोज बदलतात. मात्र 24 एप्रिलनंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते. पण मतदान होताच आणि निकाल लागताच, पुन्हा एकदा इंधन दरात चढ-उतार सुरु झाली. संबंधित बातम्या  मनसेकडून पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त भेट 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget