Raj Thackeray मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल, उद्या शस्त्रक्रिया होणार!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या (1 जून) शस्त्रक्रिया होणार असून त्यासाठी आजच (31 मे) ते मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
![Raj Thackeray मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल, उद्या शस्त्रक्रिया होणार! MNS chief Raj Thackeray admitted to Lilavati Hospital in Mumbai, will undergo hip bone surgery tomorrow Raj Thackeray मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल, उद्या शस्त्रक्रिया होणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/bd825320f8728042860e2289488cbeae_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या (1 जून) त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे आजच ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. शस्त्रक्रियेपूर्वीच्या काही चाचण्या आज केल्या जातील.
राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, 1 जूनला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही."
टेनिस खेळताना दुखापत
मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उद्या लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल.
अयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे 15 दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. हे दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला. परिणामी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
Raj Thackeray Health : राज ठाकरेंना नेमकं काय झालंय? 1 जूनला होणार शस्त्रक्रिया
Hip Bone Symptoms : राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया; हा आजार नेमका काय? वाचा संपूर्ण माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)