अमित राज ठाकरे लीलावती रुग्णलयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. थोडा ताप असल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ : मनसे नेते अमित राज ठाकरे लीलावती रुग्णलयात दाखल
लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली. तसेच त्यांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्यामुळे काहीही घाबरण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अमित ठाकरे यांच्यावर पक्षात सध्या मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. तसेच ते डॉक्टरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न यांवर स्वतः पुढाकार घेऊन काम करत आहेत.