एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

एमएमआरडीएचा 16 हजार 909 कोटींचा अर्थसंकल्प, 10 मेट्रो प्रकल्पांसाठी 7 हजार 400 कोटी

10 मेट्रो प्रकल्पांसाठी 7 हजार 400 कोटी, पारबंदर प्रकल्पासाठी 3 हजार कोटी तर सुर्या आणि प्रकल्पासाठी 700 कोटी, 2 हजार 250 कोटी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे स्मारकांसाठी 210 कोटींची तरतूद केली आहे.

मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 147 व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रुपये 16 हजार 909.10 कोटींचा अर्थसंकल्प 2019-20 साठी मंजूर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकल्पांसाठी महत्वपूर्ण अशी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महत्वकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तरतूद करण्याप्रमाणेच  दादर येथील इंदू मिल कम्पाऊंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व दादर येथीलच महापौर बंगल्याच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पामध्ये रूपये 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 10 मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव  तरतूद 10 मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये रूपये 7 हजार 486.50 इतकी तरतूद आहे. यामध्ये मेट्रो भवनासाठीची रूपये 100 कोटीची तरतूदही आहे. विविध मेट्रो प्रकल्पांसाठी करण्यात आलेली तरतूद अशी – वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 (रू.98 कोटी); दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो-2अ (रू.1 हजार 895 कोटी); डी.एन.नगर ते मंडाले मेट्रो-2ब (रू.519.60 कोटी); कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 (रू.650 कोटी);  वडाळा ते कासारवडावली मेट्रो-4 (रू.1 हजार 337 कोटी); ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 (रू.150 कोटी); समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो-6 (रू.800 कोटी); अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-7 (रू.1 हजार 921 कोटी); गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो-10 (रू.5 कोटी); वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-11 (रू.5 कोटी) आणि कल्याण ते तळोजा मेट्रो-12 (रू.5 कोटी). पारबंदर प्रकल्प आणि विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरघोस  तरतूद अर्थसंकल्पामध्ये आरे येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनासाठी रूपये 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  या भवनात प्रशिक्षण केंद्र, मेट्रो संचलन व नियंत्रण केंद्र, कार्यालये, कॅफेटेरिया प्रमाणेच सात रहिवासी मजले असणार आहेत. मुंबई आणि महानगर प्रदेशातील 13 मेट्रो मार्गाचे संचलन व नियंत्रण या मेट्रो भवनातून होणार आहे. अर्थसंकल्पामध्ये मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरघोस अशी तरतूद करण्यात आली आहे. पारबंदर प्रकल्पासाठी रूपये 3 हजार कोटी तर बहुद्देशीय मार्गासाठी रूपये 2 हजार 250 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. हे दोन प्रकल्प पर्यावणास पूरक असून इंधन व वेळेची बचत करणारे ठरणार आहेत. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तब्बल 704.20 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत 88 कि.मी. लांबीच्या पाईप लाईनव्दारे मिरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये 403 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यापैकी 185 दशलक्ष लिटर पाणी वसई-विरार तर 218 दशलक्ष लिटर पाणी मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रांना दररोज पुरवण्यात येणार आहे. सुर्या जलपुरवठा योजना अतिशय आगळी-वेगळी अशी आहे. इच्छित ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेमध्ये वीज किंवा त्या अनुषंगाने खर्च न करता गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करण्यात येणार आहे. महत्वपूर्ण प्रकल्पांना अर्थसंकल्पामध्ये प्राधिकरणाकडून प्राधान्य आणखीही काही महत्वपूर्ण प्रकल्पांना अर्थसंकल्पामध्ये प्राधिकरणाने प्राधान्य दिले आहे. 18.28 कि.मी. लांबीचा मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक पर्यंतचा दुसरा टप्पा प्राधिकरणातर्फे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने रूपये 150 कोटींची तरतूद केली आहे. मोनोरेल शिवाय इतर काही प्रकल्पांसाठी करण्यात आलेली तरतूद अशी – विस्तारीत मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्प (रू.800 कोटी, भूसंपादनासह); मुंबई नागरी परिवहन प्रकल्प  (रू.500.10 कोटी); मुंबई महानगर प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारणा (रू.143 कोटी); सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्त्याचे कुर्ला ते वाकोला पुलापर्यंत विस्तारीकरण तसेच  वांद्रे-कुर्ला संकूल ते पश्चिम दृतगती महामार्गापर्यंत उन्नत मार्ग बांधणे (रू.100 कोटी), पूर्व दृतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे उन्नत मार्ग सुधारणा करणे (रू.75 कोटी); तसेच कलिना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात पायाभूत सुविधा पुरविणे (रू.54 कोटी).
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Drugs Politics: 'ड्रग्ज तस्करीला राजाश्रय', Supriya Sule यांचे CM Fadnavis यांना पत्र
Palak Muchhal: गायिका पलक मुच्छलची विश्वविक्रमी कामगिरी, 3800 मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत
Maharashtra Politics: Drugs प्रकरणातील आरोपी Santosh Parameshwar चा BJP मध्ये प्रवेश
Ahmednagar Land Row: आमदार Sangram Jagtap यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप
Pune : 'Ajit Pawar यांनी राजीनामा द्यावा', Anjali Damania यांची मागणी, Parth Pawar यांच्यावरही आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
Embed widget