एक्स्प्लोर
निष्ठावंत माधव भांडारींऐवजी 'लाड' यांना उमेदवारीचा 'प्रसाद' का?
नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला.
मुंबई: भाजपने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने आता भाजपमधूनच नाराजीचे सूर उमटत आहेत.
नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे.
या जागेसाठी भाजपकडून पक्षनिष्ठ आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती. माधव भांडारी हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेतच, शिवाय पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण आणि ठोसपणे मांडण्याची मुख्य जबाबदारी ते नेटाने बजावतात.
असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याने, प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थापनेपासूनचा कार्यकर्ता
माधव भांडारी हे भाजपचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते आहेत. भांडारींनी भाजपचा कोकण विभाग संघटक, महाराष्ट्र भाजप प्रसिद्धी प्रमुख यांसह अनेक महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
माधव भांडारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बजावलेली कारकीर्द यशस्वी ठरली होती. महाराष्ट्रात भाजप रुजण्यास भांडारींचा महत्त्वाचा वाटा आहे.
भांडारी हे 2006 मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशाचा सहप्रवक्ते म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर प्रवक्ता आणि मीडिया, सोशल मीडिया या क्षेत्राचे प्रमुख अशाही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात आल्या.
भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण संयोजक, भाजपाच्या राष्ट्रीय जलसंसाधन सेलचा राष्ट्रीय सेल संयोजक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या विलासराव साळुंके अध्यासनाचे मानद संचालक म्हणून ते गेली अनेक वर्षे काम पाहत आहेत.
कोकणामध्ये जलसंधारण आणि जल-व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली आहे.
गेली 7 वर्षे महाराष्ट्र प्रदेशाचा मुख्य प्रवक्ता म्हणून ते काम पाहात आहेत. 2014 ची लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या काळात महाराष्ट्र भाजपाने केलेल्या प्रचार मोहिमेचे ते प्रमुख होते.
कोण आहेत माधव भांडारी
- भाजपचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते
- माधव भांडारी हे भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत.
- महाराष्ट्र भाजपचे प्रचारप्रमुख म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- संघाच्या जवळचे असलेले माधव भांडारी 1980 पासून भाजपमध्ये सक्रीय आहेत.
- लहानपणापासूनच त्यांचा संघ आणि अभाविपमध्ये सक्रीय सहभाग
- संघाच्या विचारधारेचं विवेक या साप्ताहिकाचं अतिरिक्त संपादकपद सांभाळलं
- भांडारींनी भाजपची संघटनात्मक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून ते नावारुपाला आले.
- 2006 मध्ये भांडारींनी महाराष्ट्र प्रदेश सहप्रवक्ते म्हणून नेमण्यात आलं.
- माधव भांडारी हे महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडियाचीही जबाबदारी सांभाळतात.
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम
- राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचे विश्वासू
- गेल्या वर्षी विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी
- अपक्ष म्हणून विधानपरिषद निवडणूक लढवली
- विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याकडून अवघ्या 2 मतांनी पराभव
- या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची प्रसाद लाड यांना मदत
- पराभवानंतर भाजपमध्ये प्रवेश, मुंबई उपाध्यक्षपदी नेमणूक
- मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख
- म्हाडाच्या अध्यक्षपदीही काही काळ नेमणूक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement