Jitendra Awhad : 'जीव देऊ पण वाचवू'! जितेंद्र आव्हाड यांचा मध्य रेल्वेला इशारा
मुंब्रा स्टेशनजवळ मध्य रेल्वेच्या ट्रॅक शेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठवून 7 दिवसात घरे खाली करण्याचे आदेश मध्य रेल्वेने दिले आहेत. त्या विरोधात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले.
Jitendra Awhad : "सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण पाडा असा कोर्टाचा निकाल आहे असे सांगत रेल्वे रुळाच्या थोड्या अंतरावर असलेल्यांना 7 दिवसांत घरे खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. या नोटिसा सगळ्यांना जातील जे सरकारी जागेवर राहतात. हे सगळे घाबरवण्यासाठी केले जात आहे. घाबरणार कोणीच नाही, जीव देऊ पण वाचवू असा इशारा गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेला दिला आहे.
मुंब्रा स्टेशनजवळ मध्य रेल्वेच्या ट्रॅक शेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठवून 7 दिवसात घर खाली करण्याचे आदेश मध्य रेल्वेने दिले आहेत. त्याच्याच विरोधात स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट केले आहे. या ट्विटमधून मंत्री आव्हाड यांनी मध्य रेल्वेला इशारा दिला आहे.
सरकारी जमिनी वरचे अतिक्रमण पाडा असा कोर्टाचा निकाल आहे असे सांगत रेल्वे रुळा च्या थोड्या अंतरावर असलेल्याना 7 दिवसात घर खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
ह्या नोटिसा सगळ्यांना जातील जे सरकारी जागे वर राहतात
सगळे घाबरवण्या साठी केले जात आहे
घाबरणार कोणीच नाही #जीवदेऊपणवाचवू
जितेंद्र आव्हाड यांनी आज मिठागरांच्या जागेवरूनही ट्विट केले आहे. "मिठागरे ही आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवतात. मुंबईच्या आसपास जी मिठागरे आहेत त्यावर घरे बांधण्याचा प्रस्ताव होता. परंतु, मिठागरांवर कोणत्याही प्रकारची परवानगी म्हाडाकडून आम्ही देणार नाही. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. त्यामुळे यापूढे मिठागरांवर घरे होणार नाहीत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
मिठागरांची जागा मोकळी जागा घर बांधणी साठी देऊ नका मुंबई आणि मुंबईकरांसाठी ते विनाशकारक ठरेल
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
"मिठागरांची मोकळी जागा घर बांधणीसाठी देऊ नये. मुंबई आणि मुंबईकरांसाठी ते विनाशकारक ठरेल," असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा, मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोध
- Goa Election 2022 : 'देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी' : संजय राऊत
- मेट्रो 4 च्या कारशेडचा मार्ग मोकळा होणार? आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून तोडगा
- Mumbai Local Mega Block : ठाणे-दिवा दरम्यान शेवटचे 2 मेगाब्लॉक, नंतरच पाचवी सहावी मार्गिका सुरू, मध्य रेल्वेची माहिती
- Mumbai Local Mega Block : 4 ते 6 फेब्रुवारी, मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगाब्लॉक; पाचवी-सहावी मार्गिका 6 फेब्रुवारीला खुली होणार